ETV Bharat / state

सिंधुदुर्गातील कलावंताने दगडांवर साकारल्या 50 हून अधिक कलाकृती

author img

By

Published : Jan 3, 2021, 7:42 PM IST

दगडातून मूर्ती घडवण्यासाठी शिल्पकाराला त्यावर अनेक छन्नी, हातोड्यांचे घाव घालावे लागतात. मात्र, आपल्या आसपास आढळणाऱ्या दगडांच्या मूळ आकारात कोणताही बदल न करता त्यावर विविध रंगांची उधळण करून व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे साकारण्याची आणि त्या दगडांना जिवंत करण्याची किमया कणकवलीच्या सुमन दाभोळकर या कला शिक्षकाने साधली आहे.

Suman Dabholkar artist Kankavali
सिंधुदुर्ग कलावंत सुमन दाभोळकर

सिंधुदुर्ग - दगडातून मूर्ती घडवण्यासाठी शिल्पकाराला त्यावर अनेक छन्नी, हातोड्यांचे घाव घालावे लागतात. मात्र, आपल्या आसपास आढळणाऱ्या दगडांच्या मूळ आकारात कोणताही बदल न करता त्यावर विविध रंगांची उधळण करून व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे साकारण्याची आणि त्या दगडांना जिवंत करण्याची किमया कणकवलीच्या सुमन दाभोळकर या कला शिक्षकाने साधली आहे. लॉकडाऊनमध्ये फावल्या वेळेत सुमन यांना स्टोन आर्टचा छंद जडला असून, आजवर त्यांनी दगडावर 50 हून अधिक कलाकृती तयार केल्या आहेत.

माहिती देताना कला शिक्षक सुमन दाभोळकर

हेही वाचा - चिपी विमानतळाच्या बाबतीत सत्ताधारी फक्त वल्गना करतायेत - भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली

स्टोन आर्ट ही कला वेगळी आहे. सोशल मीडियावर सुमन यांच्या अनेक कलाकृती व्हायरल होत आहेत. अनेक जण त्यांच्याकडून दगडांवर स्वतःचे पोट्रेट तयार करून घेत आहेत. तुम्हाला कलाकृतींसाठी नेमके दगड कोठून मिळते, तुम्ही दगडाच्या आकारात बदल करता का? असे प्रश्न त्यांना विचारले जातात. त्यावर दगड शोधताना नजर ही फार महत्त्वाची असल्याचे ते सांगतात. दगडांना विशिष्ट आकार देऊन शिल्पकार कलाकृती घडवतात. मात्र, स्टोन आर्ट ही कला त्यापेक्षा वेगळी आहे. सध्या रस्त्यातील प्रत्येक दगडात मला विशिष्ट आकार दिसतात, असे सुमन यांनी सांगितले.

फाईन आर्ट्सचे शिक्षण घेतलेले सुमन हे मूळचे कणकवलीचे

गेल्या दोन वर्षापासून ते ठाण्यातील न्यू हॉरिझॉन स्कॉलर्स स्कूलमध्ये आर्ट टीचर म्हणून काम पाहतात. दगडांवर कलाकृती साकारण्याची कल्पना कशी सुचली, यावर ते म्हणाले, लॉकडाऊमुळे मी बऱ्याच वर्षांनी गावी निवांत राहिलो. आमच्या घरापासून हाकेच्या अंतरावरच नदी आहे. नदीवर गेलो असता विशाल खडक माझ्यातील कलाकाराला खुणावू लागले. त्या विशाल खडकांतून मला निरनिराळे आकार दिसले. मग ते आकार प्रत्यक्षात आणण्यासाठी माझ्यातील कलेची मदत झाली. सुरुवातीला गंमत म्हणून मी दगडांवर काही पोट्रेट तयार केले. त्यात मला आनंद मिळत गेला आणि निरनिराळ्या कलाकृती घडत गेल्या. सुमन यांनी दगडावर आतापर्यंत आईनस्टाईन, सचिन तेंडुलकर, नसिरुद्दीन शहा, महेंद्रसिंह धोनी, सोनू सूद आदींचे पोट्रेट साकारले आहेत. शिवाय मासा, मांजर, कुत्रा, कासव, वडापाव या कलाकृतीही साकारल्या आहेत.

हेही वाचा - चिपी विमानतळाची उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करा - खासदार विनायक राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.