ETV Bharat / state

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स सज्ज ठेवणार - मुख्यमंत्री - सिंधुदुर्ग लेटेस्ट न्यूज

कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

author img

By

Published : May 7, 2021, 10:14 PM IST

सिंधुदुर्ग - कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते. तसेच कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सिंधुदुर्ग येथून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे

लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेवर मात करता येईल. त्यामुळे लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. 18 ते 44 वयोगटातील 6 कोटी लोकसंख्या राज्यात आहे. त्यासाठी आपल्याला 12 कोटी डोस लागणार आहेत. एक रकमी हे सर्व डोस खरेदी करण्याची तसेच दिवसाला 10 लाख लोकांना लस देण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे. पण, लस पुरेसी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सुविधा वाढवूनच तयारी करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवणे महत्त्वाचे

गेले वर्षभर कोरोनाशी आपण लढत असल्याचे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा आपण उभ्या केल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी तत्परतेने आणि जलदगतीने सुविधा उभारण्याचे काम करत आहेत, याचे समाधान आहे. राज्यातील औषधांचा पुरवठा सुरळीत होईल पण सध्या महत्वाची गरज आहे ती ऑक्सिजनची. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील याची जबाबदारी महत्वाची आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. ही चांगली बाब आहे. राज्यात सध्या मिशन ऑक्सिजन राबविण्यात येत आहे. जिल्ह्याची गरज ओळखून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवावा. कोरोना नियंत्रणात आला तरी गाफिल राहू नका, हा विषाणू घातक आहे. सध्याचा म्युटेशनचा विषाणू हा जलदगतीने पसरत आहे. त्याच्यावर आपल्याला मात करावयाची आहे. माझे कुटुंब - माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून नक्कीच कोवीडवर मात करता येणार आहे. त्यासाठी घरोघरी जाऊन लोकांचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा व निधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

'जिल्ह्याला सहा टन ऑक्सिजनची गरज'

यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याला सध्या 4 टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे. त्यामध्ये आणखी 2 टन वाढ करून जिल्ह्याला 6 टन ऑक्सिजन पुरवठा करावा तसेच एसडीआरएफचा निधीही सिंधुदुर्गला लवकर मिळावा अशी मागणी केली. नॉन कोविड रुग्णांसाठीही ऑक्सिजनचे नियोजन करावे. जिल्ह्यात सध्या माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी मोहिम राबविण्यात येत आहे. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांचा शोध घेतला जात असल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन

6 रुग्णवाहिका, 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांचेही लोकार्पण

यावेळी जिल्हा खनिकर्म निधीमधून घेण्यात आलेल्या 6 रुग्णवाहिका, 50 ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यांचेही लोकार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रस्तावना केली, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे डेडीकेटेड कोविड रुग्णालय कार्यरत आहे. या रुग्णालयासाठी एक ऑक्सिजन जनरेशन प्लांट ( पीएसए) 500 एलपीएम ( प्रतिदिनी 58 जंबो सिलेंडर्स7 क्युब मीटर) सप्टेंबर 2020 पासून कार्यरत आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोविड 19 रुग्णांची संख्या व त्यांना लागणा-या मेडीकल ऑक्सिजनची उपलब्धता होणे करीता शासनाने 1 नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट ( पीएसए) 200 एलपीएम ( प्रतिदिनी 21 जंबो सिलेंडर्स 7 क्युबीक मीटर) जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे दिलेला आहे. सदर प्लांट ऍबस्टीम कंपनीचा असुन, 23 एप्रिल 2021 रोजी प्राप्त झालेला असून, या प्लांटचे सर्व तांत्रिक जोडणीचे कामकाज पुर्ण होऊन कार्यान्वीत करणेसाठी सज्ज झालेला आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनचे नमुने तपासणी अहवाल गुणवत्तापुर्वक आलेले असून, आता रुग्णांना उपलब्ध करुन देणेची तयारी पुर्ण झालेली आहे. या प्रकल्पासाठी एकुण 70 लक्ष ( सत्तर लक्ष) खर्च आलेल असुन स्थापत्य, विद्युत कामासाठी रु.7.80 लक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेतून आणि 100 केव्हीए जनरेटर करीता रु. 15 लक्ष एवढा खर्च जिल्हा नियोजन समितीचे निधीतुन करणेत आलेला आहे.

हेही वाचा - मुंबईत दररोज ५० हजारापेक्षा जास्त परप्रांतीय मजूर होत आहेत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.