ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण, एकूण रुग्ण संख्या 69 वर - sindhudurg corona new cases news

जिल्ह्यात नव्याने एकूण 13 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 119 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 17 महिन्याच्या एका बाळाचाही समावेश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 69 झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 17 महिन्याच्या बाळाला कोरोना

author img

By

Published : Jun 1, 2020, 8:43 PM IST

सिंधुदुर्ग - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज(सोमवार) प्राप्त झालेल्या 133 कोरोना तपासणी अहवालांपैकी 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पूर्वी कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींचा अहवाल रिपीट झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने एकूण 13 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 119 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 17 महिन्याच्या एका बाळाचाही समावेश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 69 झाली आहे.

आज नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या अनुषंगाने कंटेनमेंट झोन तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 27 हजार 831 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी 404 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर, 26 हजार 175 व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 252 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. तर, जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वारगाव येथील धुमकवाडी, हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी. तर, बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार, कासार्डे येथील धुमाळवाडी, हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, पियाळी येथील गावठण, नाटळ येथील हायस्कुलची दुमजली इमारत, वैभववाडी तालुक्यातील तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, माडखोल येथील बामणादेवीवाडी, कुडाळ तालुक्यातील पणदूर – मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी असे कंटेनमेंट झोन आहेत.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 917 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 1 हजार 749 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 69 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 680 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, 168 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 123 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 54 रुग्ण डेडिकेटेड कोव्हीड रुग्णालयामध्ये, 45 रुग्ण डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोव्हीड केअर सेंटरमध्ये 24 रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 6 हजार 74 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण 69 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 7 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाला असून एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 60 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 मेपासून आजअखेर एकूण 62 हजार 609 व्यक्ती दाखल झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.