ETV Bharat / state

नेत्रावती एक्सप्रेसमधून ८६ हजार रुपयांची दारू जप्त

मुंबईच्या दिशेने जाणार्‍या नेत्रावती एक्सप्रेसमधून रेल्वे सुरक्षा दलाने ८६ हजार रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.

नेत्रावती एक्सप्रेसमधून ८६ हजार रुपयांची दारू जप्त
author img

By

Published : Mar 16, 2019, 4:48 PM IST

सिंधुदुर्ग - मुंबईच्या दिशेने जाणार्‍या नेत्रावती एक्सप्रेसमधून रेल्वे सुरक्षा दलाने ८६ हजार रुपयांची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी अचानक सुरक्षा दलाने तपास मोहीम राबवली. तपासात ट्रेनमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या दारूच्या ५६२ बाटल्या रेल्वे पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत.

रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक अरूण लोट व हवालदार शहाजी पवार यांनी नेत्रावती एक्सेप्रेसमध्ये तपासणी मोहीम राबवली. त्यांनी कुडाळ स्थानकावरून सकाळी ८ वाजता तपासणी मोहिमेस सुरूवात केली. यादरम्यान नेत्रावती एक्सप्रेसमध्ये स्लीपर कोचच्या सीटखाली ७ बॅग लपून ठेवल्याचे आढळून आले. याविषयी प्रवाशांकडे विचारणा केली असता ती बॅग बेवारस असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तत्काळ या सातही बॅगची झडती घेण्यात आली. त्यावेळी यात गोवा बनावटीची दारू सापडली. या मद्यसाठ्यात वेग-वेगळ्या कंपनीच्या ७५०, १८०, ९० मिलीच्या सुमारे ४०० बाटल्या, असा मुद्देमाल होता.

हा सर्व मुद्देमाल रेल्वे पोलिसांनी जप्त करून रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरवला. तेथून हा माल डबल डेकर ट्रेनमधून कणकवली स्थानकावर पाठवण्यात आला. तेथून सदर मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गच्या ताब्यात देण्यात आला.

Intro:मुंबईच्या दिशेने जाणार्‍या नेत्रावती एक्सप्रेस मध्ये रेल्वे सुरक्षा बलाकडून शुक्रवारी अचानक तपासणी मोहीम राबवण्यात आली. तपासणी दरम्यान ट्रेनमध्ये गोवा बनावटीची सुमारे ८६ हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या दारूच्या सुमारे ५६२ बाटल्या रेल्वे पोलिसांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यामुळे रेल्वेतून बेकायदेशीर दारू वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. Body:कोकण रेल्वे मार्गावरून शुक्रवारी सकाळी मुंबईच्या दिशेने धावणार्‍या नेत्रावती एक्सप्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाने अचानक तपासणी मोहीम राबवली. रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक अरूण लोट व हवालदार शहाजी पवार यांनी ही झडती सुरू केली. त्यांनी कुडाळ स्थानका वरून सकाळी ८ वा. च्या सुमारास तपासणी मोहीम सुरू केली. या दरम्यान नेत्रावती गाडीच्या स्लीपर कोच मध्ये सीटच्या खाली सात बॅग लपून ठेवल्याचे त्यांना आढळून आले. या विषयी त्यांनी तेथील प्रवाशांकडे विचारणा केली असता त्या बेवारस असल्याचे त्यांना निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी तात्काळ बॅगाची झाडा झडती घेतली असता, त्यात गोवा बनावटीची दारू सापडली. त्यामुळे बेकायदा मद्याच्या वाहतुकीचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या मद्यसाठ्यात वेग वेगळ्या ब्रँडच्या ७५०, १८०, ९० मि.ली.च्या सुमारे ४०० बाटल्या असा मुद्देमाल होता.Conclusion:रेल्वे पोलिसांनी बेकायदेशीर दारूचा मुद्देमाल जप्त करत तो रत्नागिरी स्टेशनवर उतरवला. तेथून डबल डेकर ट्रेनमधून कणकवली स्टेशनवर पाठवण्यात आला. तसेच सदर मुद्दे माल राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गच्या ताब्यात देण्यात आला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.