ETV Bharat / state

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा कारभार रामभरोसे; एकूण 84 पदे रिक्त

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यास विलंब होत आहे. विविध विभागातील एकूण ८४ पदे रिक्त आहेत.

Sindhudurg District Hospital
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Nov 23, 2020, 9:18 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्हा सामान्य रुग्णालय हे जिल्ह्यातील 7 लाख 90 हजार जनतेच्या आरोग्याचा आधारस्तंभ मानला जातो. मात्र, अनेक रिक्त पदांमुळे सध्या या रुग्णालयाची अवस्था वाईट झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील नियमित कामकाजासाठी एकूण 251 पदे मंजूर आहेत. यातील 167 पदे भरलेली असून 84 पदे अद्यापही रिक्त आहेत. वर्ग 1 मधील मंजूर 16 पदांपैकी केवळ 3 पदे भरलेली आहेत. यात निवासी वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, बाल रोगतज्ज्ञ, शस्त्रक्रिया वैद्यकीय अधिकारी अशा महत्वाच्या पदांचा समावेश आहे.

एरवी जिल्ह्यातील जनता शासकीय आरोग्य सुविधेवर तशी अवलंबून नसते. त्यामुळे काही उणीवा असल्यातरी कुणी जास्त लक्ष देत नाही. परंतु कोरोना काळात अपुऱ्या सुविधेमुळे जनतेचे होणारे नुकसान अधिक गडद बनले आहे. यावेळी शासकीय आरोग्य सुविधेची गरज का असते? हे जास्त स्पष्ट झाले. त्यामुळे गेल्या 9-10 महिन्यात रिक्त पदे व अपुरी सामग्री यांची जोरदार चर्चा होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ही चर्चा जास्तच झाली. कारण येथील रिक्त पदे व अपुरे साहित्य याची टक्केवारी जास्त आहे.

जिल्हा रूग्णालय वर्ग 2 मध्ये एकूण 18 पदे मंजूर आहेत. यातील 15 पदे भरलेली असून 3 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये दंत शल्य चिकित्सक हे मंजूर नसलेले एक पद रिक्त आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी वर्ग 2 चे मंजूर एकच पद रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या मंजूर 16 पैकी 15 पदे भरलेली आहेत. क वर्गात 128 पदे मंजूर आहेत. यातील 94 पदे भरली आहेत तर, 34 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये अधिसेविका एक, सहाय्यक अधिसेविका, परिसेविका 10, बालरोग परिसेविका 2, मनोविकृती परिसेविका एक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2, भौतिकोपचार तज्ज्ञ एक, दंत आरोग्यक एक, दंत यांत्रिकी, भांडारपाल तथा वस्त्रपाल एक, स्वच्छता निरीक्षक एक, दूरध्वनी चालक 2, शिंपी एक, नळ कारागिर एक, सुतार एक, लघु टंकलेखक (मराठी) एक, वरिष्ठ लिपिक एक, टंकलेखक लिपिक एक अशाप्रकारे एकूण 34 पदे रिक्त आहेत.

वर्ग 4 मध्ये 89 पदे मंजूर असून 54 पदे भरलेली आहेत तर, 35 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये मुकादम 2, बाह्यरुग्ण सेवक एक, अपघात विभाग सेवक 2, शस्त्रक्रियागृह परिचर 2, सफाईगार 17, धोबी एक, न्हावी एक, सहाय्यक स्वयंपाकी एक, पहारेकरी 3, माळी एक अशी पदे रिक्त आहेत. सफाईगारची 26 पदे मंजूर आहेत. यातील 9 पदे नियमित भरलेली आहेत. रिक्त 17 मधील 12 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली आहेत. तरीही पाच पदे रिक्तच आहेत. रिक्त असलेले स्वच्छ्ता निरीक्षकचे एक पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेले आहे. तसेच न्हावी एक, सहाय्यक स्वयंपाकी एक, पहारेकरी 2, माळी एक ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत.

जिल्हा रुग्णालयात नियमित नेत्र शल्य चिकित्सक हे पद रिक्त असताना विशेषोपचार कक्षात सुद्धा ही पदे रिक्त आहेत. फिरत्या नेत्र पथकामधील 4 पैकी 2 पदे रिक्त आहेत. यात नेत्र शल्य चिकित्सक नेत्र चिकित्सा अधिकारी या दोन पदांचा समावेश आहे. 20 खाटांचे नेत्र रुग्णालयात 9 पदे मंजूर असून त्यातील एकच पद रिक्त आहे; मात्र ते महत्वाचे नेत्र शल्य चिकित्सक पदाचा समावेश आहे. अतिदक्षता विभागातील 18 मंजूर पदांतील 13 पदे भरलेली आहे. 5 पदे रिक्त आहेत. यात परिसेविका एक, सफाईगार 4 पदांचा समावेश आहे. नवजात बाल अतिदक्षता विभागातील 10 पैकी 4 पदे भरलेली आहे. तर 6 पदे रिक्त आहेत. यामध्ये बालरोग परिचारिका एक, आया (कक्ष सेविका) 3, सफाईगार 2 अशी पदे रिक्त आहेत. सुश्रुषा कक्षात मंजूर 24 पैकी तब्बल 13 पदे रिक्त आहेत. केवळ 11 पदे भरलेली आहेत. रिक्त पदांत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा एक, परिसेविका वर्ग 2 एक, कक्षासेवक 5, सफाईगार 6 अशी पदे रिक्त आहेत. तर रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रातील 3 पैकी 2 पदे भरलेली असून एक पद रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 हे पद रिक्त आहे. सुश्रुषा प्रशिक्षण संस्थेतील 10 पैकी 5 पदे रिक्त आहेत. मनोविकृती चिकित्सा केंद्रातील 20 पैकी 14 पदे रिक्त आहेत. यामध्ये मनोविकृती चिकित्सक समावेश आहे. जळीत कक्षातील तीन पैकी एक पद रिक्त आहे. अपंग पुनर्वसन केंद्रातील 4 पैकी 3 पदे रिक्त आहेत. ट्रामा केअर यूनिटमधील 15 पैकी 11 पदे रिक्त आहेत. सिटी स्कॅन विभागातील 9 पैकी 6 पदे रिक्त आहेत. जीएनएम नर्सिंग स्कूलमधील 24 पैकी 24 पदे रिक्त आहेत.

जिल्हा रुग्णालयात अ वर्गाची एकूण 16 पदे मंजूर आहेत. यातील जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि वधिकरण शास्त्रज्ञ ही तिनच पदे भरलेली आहेत. तर निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क), वैद्यकीय अधिकारी (भिपक), वैद्यकीय अधिकारी (शस्त्रक्रिया), वैद्यकीय अधिकारी (स्त्री रोग व प्रसूती तज्ञ), बाल रोग तज्ञ, अस्थिव्यंग शल्य चिकित्सक, क्ष-कीरण शास्त्रज्ञ, शरीर विकृती शास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी चर्मरोग, वैद्यकीय अधिकारी (क्षयरोग चिकित्सक), नेत्र शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी (कान, नाक, घसा तंज्ञ) ही 13 पदे रिक्त आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.