ETV Bharat / state

सिंधुदुर्गात येण्यासाठी अन् जाण्यासाठी 49 हजार लोकांनी केली नोंदणी - Sindhudurg people trapped in lockdown

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढू लागली आहे. सिंधुदुर्गात येण्यासाठी 18 हजार 854 व्यक्ती इच्छुक आहेत. राज्याबाहेर जाण्यासाठी 17 हजार 130 व्यक्तींनी नावनोंदणी केली आहे, तर अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी 13 हजार 25 जणांची नोंदणी केली आहे.

Tehsil Office
तहसील कार्यालय
author img

By

Published : May 12, 2020, 2:15 PM IST

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात येण्यासाठी आणि जिल्ह्यातून अन्य भागात जाण्यासाठी अनेकांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात सध्या चाकरमान्यांचा ओघ सुरूच आहे. सिंधुदुर्गात येण्यासाठी 18 हजार 854 व्यक्ती इच्छुक आहेत. राज्याबाहेर जाण्यासाठी 17 हजार 130 व्यक्तींनी नावनोंदणी केली आहे, तर अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी 13 हजार 25 जणांची नोंदणी केली आहे.

सिंधुदुर्गात येण्यासाठी अन् जाण्यासाठी 49 हजार लोकांनी केली नोंदणी

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढू लागली आहे. होम क्वारंटाईन आणि संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या व्यक्तींची संख्या 946 वर पोहोचली आहे. मात्र, सुदैवाने आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 26 रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

अन्य जिल्ह्यात जाण्यासाठी 13 हजार 25 जणांची नोंदणी

आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यासाठी 13 हजार 25 व्यक्तींनी जिल्हा प्रशासनाच्या लिंकवर नोंद केली आहे. या सर्वांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यामध्ये प्रवेश देण्याबाबत त्या-त्या जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले आहे.

राज्याबाहेर जाण्यासाठी 17 हजार 130 व्यक्तींची नोंदणी -

राज्याबाहेर जाण्यासाठी 17 हजार 130 व्यक्तींनी लिंकवर नोंदणी केली आहे. नोंद केलेल्यांची यादी संबंधित राज्यातील नोडल अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. तसेच परराज्यात जाणाऱया व्यक्तींना त्यांच्या संबंधित राज्याच्या लिंकवर पास उपलब्ध करून देण्याविषयी संबंधित राज्यांना कळवले आहे. ही माहिती अर्जदारांना हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये एसएमएसच्या माध्यमातून कळवण्यात आली आहे.

सिंधुदुर्गात येण्यासाठी 18 हजार 854 व्यक्ती इच्छुक -

सिंधुदुर्गात येण्यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून 18 हजार 864 व्यक्तींनी नोंदणी केली आहे. त्यापैकी रेड झोनमधील आणि कंटेन्मेंट झोनमधील व्यक्ती वगळून इतर क्षेत्रातील व्यक्तींना परवानगी देण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला कळवले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 11 कॅम्पमध्ये एकूण 215 कामगार आणि बेघर व्यक्ती वास्तव्याला आहेत. या सर्वांच्या निवासासोबतच भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.