ETV Bharat / state

Yogendra Yadav: देशात लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत - योगेंद्र यादव - पृथ्वीराज चव्हाण

देशात लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. याविरोधात भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) देशातील जनतेचे मौन तोडेल, असा विश्वास स्वराज्य इंडिया पार्टीचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी व्यक्त केला.

Yogendra Yadav
योगेंद्र यादव
author img

By

Published : Nov 3, 2022, 6:54 PM IST

Updated : Nov 3, 2022, 7:04 PM IST

सातारा: आज देशात केवळ लोकशाहीवरच नाही तर संपूर्ण राज्यघटने वर संकट आहे. देशात लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. याविरोधात आवाज उठविण्याची गरज होती. तो आवाज राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमुळे (Bharat Jodo Yatra) बुलंद होईल. ही भारत जोडो यात्रा देशातील जनतेचे मौन तोडेल, असा विश्वास स्वराज्य इंडिया पार्टीचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते.

योगेंद्र यादव

देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचे प्रयत्न: केजरीवाल सरकारचा दाखला देत योगेंद्र यादव म्हणाले की, दिल्लीत एक मंत्री डॉ. बाबासाहेबांची शपथ घेतो. त्याच्या विरोधात भाजप देशभर आंदोलन करते आणि आम आदमी पार्टी त्याला पक्षातून काढून टाकते. आज त्याच पध्दतीने हिंदुत्वाच्या आडून देशात पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत. हे महाराष्ट्रात येऊन सांगण्याची गरज नाही. कारण, महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर कसे सरकार बनले आहे तो गुवाहाटीवाला ड्रामा संपुर्ण देशाने पाहिला आहे. या देशातील धर्मनिरपेक्षता संपवून टाकली आहे. तथाकथित धर्म संसदेच्या नावावर एखाद्या समुदायाच्या लोकांना मारण्याचे खुले आवाहन केले जात आहे. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद होत नाही आणि कोणाला तुरूंगातही जावे लागत नाही. हे सर्व सत्तेच्या आशिर्वादाने होते, असा आरोपही त्यांनी केला.

संसदच समस्यांचा हिस्सा बनली: संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकांकडून देश तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशापुढील एवढ्या मोठ्या संकटाचे समाधान संसदेकडून होऊ शकत नाही, कारण संसदच या समस्यांचा हिस्सा बनली आहे. दुर्देवाने या संकटाचे समाधान कोर्ट-कचेरी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनही होत नाही आहे. लोकशाहीच्या इतिहासात ज्यावेळी असे प्रसंग आले आहेत त्यावेळी जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागले आहे. आज हेच काम भारत जोडो यात्रा करत आहे. या पदयात्रेने देशासमोरील बेरोजगारी, गरिबी, महागाई, वाढती अर्थिक विषमता यासारखे मुद्दे जनतेसमोर आणले असल्याचे योगेंद्र यादव म्हणाले.

ही यात्रा सुडाच्या राजकारणाविरोधात उभी राहिली: देशातील सुडाच्या राजकारणाविरोधात भारत जोडो यात्रा उभी राहिली आहे. त्यामुळे आम्ही सर्व संघटनांनी जुने मतभेद बाजूला ठेऊन या यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे योगेंद्र यादव म्हणाले. घरात आग लागलेली असेल तेव्हा जो पाण्याची बादली उचलेल तो माझा मित्र आहे. याच संकल्पनेने आम्ही भारत जोडो यात्रेत सामील झालो आहोत. महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यातून आमची पोट पदयात्रा 9 तारखेला नांदेडला पोहचेल आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला जाऊन मिळेल.

Last Updated : Nov 3, 2022, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.