ETV Bharat / state

जागतिक वारसा दिन : मराठ्यांच्या राजधानीत पाश्चात्य धाटणीची दगडी इमारत..!

साताऱ्यातील मोती चौकातून, कर्मवीर मार्गाने म्हणजे खालच्या रस्त्याने निघालात तर रस्त्याच्या दुतर्फा माडीच्या अनेक दू-तिमजली इमारती दिसतात. सम्राट चौकाच्या पुढे दहा-बारा पावलांवर रस्त्याच्या डाव्या बाजूस एक टुमदार, देखणी इमारत दृष्टीस पडते. हीच ती दगडी इमारत.

जागतिक वारसा दिन : मराठ्यांच्या राजधानीत पाश्चात्य धाटणीची दगडी इमारत..!
जागतिक वारसा दिन : मराठ्यांच्या राजधानीत पाश्चात्य धाटणीची दगडी इमारत..!
author img

By

Published : Apr 18, 2020, 5:17 PM IST

Updated : Apr 18, 2020, 5:51 PM IST

सातारा - मराठ्यांच्या चौथ्या राजधानीच्या शहरात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणी कौशल्यामुळे ही इमारत उठून दिसते. कोणी सरदार-मुतालिक, दिवाण किंवा महाजनी यांचा हे निवास असेल असेही वाटते. कोणाची इमारत असेल? आतून ती कशी असेल? हे बांधकाम कधीचे? किती खर्च आला असेल? असे एक ना अनेक कुतूहलपूर्ण प्रश्न सातारकरांच्या मनात घर करून आहेत. आज शनिवार, 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आमच्या प्रतिनिधीने साताऱ्यातील वास्तू कलेचा दुर्मिळ नमुना असलेल्या दगडी इमारतीस भेट देऊन अवघ्या ९३ वर्षांच्या या मुक साक्षीदारास बोलका करण्याचा प्रयत्न केला.

जागतिक वारसा दिन : मराठ्यांच्या राजधानीत पाश्चात्य धाटणीची दगडी इमारत..!

साताऱ्यातील मोती चौकातून, कर्मवीर पथाने म्हणजे खालच्या रस्त्याने निघालात तर रस्त्याच्या दुतर्फा माडीच्या अनेक दू-तिमजली इमारती दिसतात. सम्राट चौकाच्या पुढे दहा-बारा पावलांवर रस्त्याच्या डाव्या बाजूस एक टुमदार, देखणी इमारत दृष्टीस पडते. हीच ती दगडी इमारत. यामध्ये अंबालाल पवार राहतात. त्यांचे आजोबा बाळूसा अ‍ानंदसा पवार यांनी 1927 मध्ये ही इमारत बांधली. बांधकामाला काही लाख रुपये खर्च आला. त्यावेळी साधारण 18 रुपये 40 पैसे तोळा सोन्याचा भाव होता. त्या काळातील हे लाख रुपये आहेत. यावरुनच बांधकाम खर्चाच्या मूल्याचा अंदाज आज आपण करू शकतो.

बाळूसा पवार यांची सावकारी पेढी होती. शेअर्स मध्येही ते व्यवसाय करायचे. काही शहरात त्यांचे क्लबही होते. या दगडी इमारतीत, माडीवर पूर्वी औंध बँक होती. त्यामुळे 'औंध बँकेची बिल्डिंग' अशीही ओळख बुजुर्गांच्या तोंडी ऐकायला मिळते.

साधारण 15 ते 17 फूट उंचीची दगडी कमान असलेली दालने, अजस्र तुळ्या, लाकूड-दगड‍-धातूवरील नक्षीकाम, भव्य न्हानीघर, दरवाजे-खिडक्या यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, झडपाला रंगीत काचेची तावदाने, भिंतीवर-दगडावरील कोरीव काम, सिलिंगला धातूचे नक्षीकाम या इमारतीच्या वैभवाची आणि स्थापत्य व कलात्मक मुल्याची साक्ष देतात. बांधकामात काही ठिकाणी वापरण्यात आलेल्या बिडाच्या जाळ्या बहुदा परदेशातून आयात केलेल्या असाव्यात. मुळचे इलेक्ट्रीक साहित्यही असा अंदाज आहे.

साताऱ्यातील जिज्ञासा मंचचे कार्याध्यक्ष निलेश पंडीत यांनी सांगितले घडीव काळा दगड इमारतीच्या जोत्याला तसेच काही ठिकाणी खांबाला वापरला आहे. शिवाय तांबडा दगड, मार्बलचा वापर बांधकामात दिसतो. ब्रिटीश किंवा पाश्चिमात्य स्थापत्य शैलीतील ही इमारत आहे. या पद्धतीचे दुसरे वास्तूशिल्प साताऱ्यात नाही. इमारत बांधणारी व्यक्ती रसिक असावेत. त्यांचे विविध शहरांत फिरणे झाले असेल. त्यामुळेच एका वेगळ्या इमारतीने साताऱ्याच्या सौंदर्यात भर घातली.

Last Updated : Apr 18, 2020, 5:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.