ETV Bharat / state

हाथरसमध्ये अस्मिता अन् न्यायव्यवस्था गाडली गेली - डॉ. सविता मोहिते - सातारा आंदोलन बातमी

कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर मिळून सार्‍याजणी, सौ. जाई यशवंतराव मोहिते महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि कराड इनरव्हील क्लबच्या महिलांनी काळ्या फिती लावून हाथरस घटनेचा निषेध केला.

satara
हाथरस घटनेच्या निषेधार्थ साताऱयात महिलांचे आंदोलन
author img

By

Published : Oct 6, 2020, 4:20 PM IST

कराड (सातारा) - उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेत कोवळ्या मुलीवर अत्याचार होऊनही फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल केला. कायदा धाब्यावर बसवून कुटुंबाच्या परस्पर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व पुरावे नष्ट करून युपी सरकारने अस्मिता आणि न्याय व्यवस्थाच गाडून टाकल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता मोहिते यांनी केला.

हाथरस घटनेच्या निषेधार्थ साताऱयात महिलांचे आंदोलन

कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर मिळून सार्‍याजणी, सौ. जाई यशवंतराव मोहिते महिला नागरी सहकारी पतसंस्था आणि कराड इनरव्हील क्लबच्या महिलांनी काळ्या फिती लावून हाथरस घटनेचा निषेध केला. प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा छाया पवार, अ‍ॅड. वंदना कोरडे, श्रुती जोशी, वृषाली पाटणकर, विजयाश्री पाटील, संगिता पाटील, विजया पाटील, राजश्री सुतार, उज्ज्वला यादव, उमेरा मुल्ला, सविता यादव, स्वाती माने आणि भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह महिला, तरूणी उपस्थित होत्या.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या देशात दलित समाजातील मुलींवर झालेला अत्याचाराचा प्रकार अतिशय लांच्छनास्पद आहे. ही घटना देशाच्या प्रतिमेला काळिमा फासणारी आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याऐवजी त्या मुलीच्या मृतदेहावर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे लोकांचा कायदा आणि न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडाला असल्याचे डॉ. मोहिते म्हणाल्या.

या घटनेविरोधात महिलांपेक्षा पुरुष वर्गाने संवेदनशील होणे जास्त गरजेचे असून, त्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून त्या कृत्याचा निषेध नोंदवावा, असे आवाहन डॉ. सविता मोहिते यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.