सातारा - महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत बलात्कार करणार्या संशयित आरोपीस सातारा तालुका पोलिसांनी काल (बुधवारी) अटक केली. बलात्काराची घटना 17 नोव्हेंबरला घडली होती. शंकर बबन जाधव (रा. करंडी ता. जि.सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
कास रस्त्यावर आटाळी (ता. सातारा) येथील एका हॉटेलात शंकरने एका महिलेस व्हिडिओ क्लिप व्हायरल करून बदनामी करेन, अशी भीती दाखवली होती. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. याबाबत शंकरची पत्नी माधुरी व बहिण अलका यांनी देखील पीडित महिलेस बदनामी करण्याची भीती घातली होती. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी नंतर संशयित आरोपीला अटक केली.
हेही वाचा- कराडातील 'त्या' हाणामारीप्रकरणी मुलींच्या दोन गटांकडून परस्परविरोधी तक्रार