सातारा - पोलीस ठाण्यात दाखल असलेला बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी सैन्यातील जवानाकडून दीड लाखांची खंडणी घेणाऱ्या महिलेसह दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. नामदेव भोसले (रा.महादरे, सातारा) असे अटकेत असलेल्या एका आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - सत्य बाहेर येईल म्हणूनच पवारांचा 'एनआयएला' विरोध - फडणवीस
काही दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन सैन्यातील जवानावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपासादरम्यान तक्रारदार महिला तपासात सहकार्य न करता दिशाभुल करणारी माहिती पोलिसांना देत होती. या प्रकरणातील जवान आणि त्याच्या नातेवाईकांना गुन्हा दाखल न करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी सहआरोपी भोसले यानेही २ लाखांची मागणी केली होती.
हेही वाचा - 'आज छत्रपतींची आठवण येते..! त्यांच्या काळातील कायदे आता लागू करण्याची गरज'
या प्रकरणी आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी शाहूपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी संदीप शितोळे, दोन पंच आणि फोटोग्राफरसह राजवाड्यावर अजिंक्य गणेश मंदीराजवळ सापळा रचला होता. यादरम्यान आरोपी महिलेसह तिच्या साथीदाराने २ लाख रुपयांपैकी पहिला हप्ता दीड लाख रुपये आणि गुन्हा रद्द झाल्यावर ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. अखेर याप्रकरणी जवानाच्या तक्रारीनंतर शनिवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भा.द.वि.क.३८९,३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.