ETV Bharat / state

साताऱ्यात पोलिसाविरुध्द बलात्काराचा गुन्हा, महिला पोलिसाची तक्रार - satara latest news

पोलीस मुख्यालयातील संशयित पोलीस शिपाई अक्षय सतीश कांबळे (ता.सातारा) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला पोलिसानेच याबाबत तक्रार दिली असून शाहूपुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सातारा
सातारा
author img

By

Published : Jan 22, 2020, 7:24 PM IST

सातारा - महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील संशयित पोलीस शिपाई अक्षय सतीश कांबळे (ता.सातारा) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला पोलिसानेच याबाबत तक्रार दिली असून शाहूपुरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, संशयिताने पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून तरुणाचा खून

संशयित अक्षय कांबळे व तक्रारदार तरुणी यांची ओळख आहे. या ओळखीचा गैरफायदा घेऊन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करतो,’ असे सांगून आश्‍वासन दिले. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने जून 2019 ते नोव्हेबर 2019 या कालावधीत तिच्यावर इच्छेविरुध्द वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.

संशयित कांबळे याने तरुणीकडून 50 हजार रुपये उसने घेतले. गेल्या काही दिवसांपासून तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तो त्याबाबत टाळाटाळ करू लागला. उसने घेतलेले पैसे मागितल्यानंतर ते पैसेही देण्यास त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने शाहूपुरी पोलीस ठाण्यात कांबळे विरुध्द तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संशयिताला पोलिसांनी अटक केली असून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याला पोलीस कोठडी दिली.

हेही वाचा - साताऱ्यात रंगली राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

बलात्काराचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी संशयिताला एका पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी वादावादी सुरू असताना त्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ गोंधळ उडाला.

Intro:सातारा पोलिस मुख्यालयातील कर्तव्य बजावत असलेल्या अक्षय सतीश कांबळे (ता.सातारा) या पोलिसाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिसानेच याबाबत तक्रार दिली असून शाहूपुरी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहेे. दरम्यान, संशयिताने एका पोलिस ठाण्यात आत्महत्या नाट्याचा प्रयत्न केला असल्याचीही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Body:याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील पिडीत तक्रारदार युवती त्याही पोलिस आहेत. संशयित अक्षय कांबळे व तक्रारदार युवती यांची ओळख आहे. या ओळखीचा गैरफायदा घेवून ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करतो,’ असे सांगून आश्‍वासन दिले. लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने जून 2019 ते नोव्हेबर 2019 या कालावधीत राधिका रोड येथील एका खोलीत संशयिताने इच्छेविरुध्द वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले.

संशयित पोलिस अक्षय कांबळे याने तक्रारदार युवतीकडून 50 हजार रुपये उसने घेतले. गेल्या काही दिवसांपासून तक्रारदार युवतीने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर संशयित त्याबाबत टाळाटाळ करु लागला. उसने घेतलेले पैसे मागितल्यानंतर ते पैसेही देण्यास संशयिताने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार युवतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जावून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यानुसार पोलिस अक्षय कांबळे याच्याविरुध्द बलात्कार व फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्याला पोलिस कोठडी दिली.

बलात्काराचा गुन्हा दाखल होण्यापूर्वी संशयिताला एका पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी वादावादी सुरु असतानाच संशयिताने विषाची बाटली काढली व ती प्राशन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संपूर्ण पोलिस ठाण्यात पळापळ झाली व संशयिताकडून विषाची बाटली ताब्यात घेण्यात आली. या सर्व नाट्य प्रकारानंतर संबंधितांचा ताबा घेवून त्यांना शाहूपुरी पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले.Conclusion:सातारा पोलीस
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.