ETV Bharat / state

कराडजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात; लालबागची महिला ठार, पाच जखमी

author img

By

Published : Feb 1, 2020, 7:55 AM IST

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर येथे झालेल्या अपघातामध्ये मुंबईच्या लालबागमधील महिलेचा मृत्यू झाला आहे.

woman death in Accident in Karad
कराडजवळ 3 वाहनांचा विचित्र अपघात

सातारा- पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर (ता. कराड) येथे शुक्रवारी सकाळी 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात मुंबईच्या लालबागमधील एक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिल्पा मनोहर भगत (वय 62, रा. लालबाग मुंबई), असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर हर्षद मनोहर भगत (वय 40), मनोहर आत्माराम भगत (वय 60), मिताली अनंत सपकाळ (वय 32, तिघेही रा. लालबाग मुंबई), कार चालक सतीश साहेबराव भोईटे (वय 45), पीकअप चालक महेश आनंदा गायकवाड (वय 28, रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा), असे 5 जण या अपघातात जखमी झाले आहेत.

मुंबईत लालबागमध्ये राहणारे भगत कुटुंबीय ब्रिझा कारमधून (एमएच-01-सीटी-3939) मुंबईहून कोल्हापूरकडे निघाले होते. शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर येथे कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि महामार्गावरील दुभाजक तोडून कारने पलीकडच्या रस्त्यावर जाऊन कोल्हापूर बाजूकडून सातारा बाजूकडे निघालेल्या पिकअपला (एमएच-45-टी-4096) धडक दिली. हा अपघात चुकविण्याच्या नादात एक टेम्पोही (एमएच-09-सीयू-1953) पलटी झाला. या 3 वाहनांच्या विचित्र अपघातात ब्रिझा कारमधील शिल्पा भगत यांचा मृत्यू झाला.

सकाळच्या सुमारास अपघात झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. क्रेनच्या सहाय्याने तिन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

Intro:पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर (ता. कराड) येथे शुक्रवारी सकाळी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात मुुंबईच्या लालबागमधील एक महिला ठार झाली, तर पाच जण जखमी झाले. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. Body:
कराड (सातारा) - पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर (ता. कराड) येथे शुक्रवारी सकाळी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात मुुंबईच्या लालबागमधील एक महिला ठार झाली, तर पाच जण जखमी झाले. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 
शिल्पा मनोहर भगत (वय 62, रा. लालबाग मुंबई), असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. हर्षद मनोहर भगत (वय 40), मनोहर आत्माराम भगत (वय 60), मिताली अनंत सपकाळ (वय 32, तिघेही रा. लालबाग मुंबई), कार चालक सतीश साहेबराव भोईटे (वय 45), पीकअप चालक महेश आनंदा गायकवाड (वय 28, रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा), असे पाच जण या अपघातात जखमी झाले आहेत. 
   लालबागमध्ये (मुंबई) राहणारे भगत कुटुंबीय ब्रिझा कारमधून (क्र. एम. एच. 01 सी. टी. 3939) मुंबईहून कोल्हापूरकडे निघाले होते. शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर (ता. कराड) येथे कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि महामार्गावरील डिवायडर तोडून कारने पलिकडेच्या लेनवर जाऊन कोल्हापूर बाजूकडून सातारा बाजूकडे निघालेल्या पिकअप टेम्पोला (क्र. एम. एच. 45 टी. 4096) धडक दिली. हा अपघात चुकविण्याच्या नादात एक टेम्पोही (क्र. एम. एच. 09 सी. यू. 1953) पलटी झाला. या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ब्रिझा कारमधील शिल्पा भगत या जागीच ठार झाल्या, तर हर्षद भगत, मनोहर भगत, मिताली सपकाळ, कार चालक सतीश भोईटे, पिकअप चालक महेश गायकवाड, असे पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तात्काळ खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. 
   सकाळच्या सुमारास अपघात झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनाम केला. के्रनच्या साह्याने अपघातग्रस्त तिन्ही वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतुक सुरळित केली. 
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.