ETV Bharat / state

सरकार कुणाचं बनेल, सांगता येत नाही - पृथ्वीराज चव्हाण

सरकार कुणाचे बनेल हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणमधून विजयी झालेले आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्ष एकदिलाने निवडणूक लढले. त्यामुळे निवडणुकीत चांगले यश मिळाले, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणमधून विजयी झालेले आमदार पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Oct 25, 2019, 8:56 PM IST

सातारा - सरकार कुणाचे बनेल हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणमधून विजयी झालेले आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. कराड येथील विजयी सभेत ते बोलत होते. तसेच पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्षांनी एकदिलाने निवडणूक लढल्याचेही ते म्हणाले.

निकाल घोषित होऊन चव्हाण यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुरूवारी रात्री कराड येथे विजयी सभा घेतली. सभेत बोलताना चव्हाण म्हणाले, आधी जनतेची सेवा करून मगच त्यांचा आशिर्वाद मागायला आले पाहिजे. मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्या तरी अजुन लढाई संपलेली नाही. ही विचारांची लढाई आहे. उद्या कुणाचेही सरकार झाले तरी आपल्या पक्षाची आणि पक्षाच्या विचारांची ताकद आपण वाढविली पाहिजे.

हेही वाचा - 'कराड दक्षिण'वर पुन्हा पृथ्वी'राज'!

शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्ष एकदिलाने निवडणूक लढले. त्यामुळे निवडणुकीत चांगले यश मिळाले, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील सहकार्‍यांचे आभारही मानले.

Intro:सरकार कुणाचं होईल, हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणमधून विजयी झालेले आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कराड येथील विजयी सभेत केले. तBody:
कराड (सातारा) - सरकार कुणाचं होईल, हे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि कराड दक्षिणमधून विजयी झालेले आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कराड येथील विजयी सभेत केले. तसेच पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्ष एकदिलाने निवडणूक लढल्याचेही ते म्हणाले. 
   निकाल घोषित होऊन आ. चव्हाण यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी गुरूवारी रात्री कराड येथे विजयी सभा घेतली. सभेत बोलताना आ. चव्हाण म्हणाले, आधी जनतेची सेवा करून मगच त्यांचा आशिर्वाद मागायला आलं पाहिजे. मागील निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळाल्या असल्या तरी अजुन लढाई संपलेली नाही. ही विचारांची लढाई आहे. उद्या कुणाचंही सरकार झालं तरी आपल्या पक्षाची आणि पक्षाच्या विचारांची ताकद आपल्याला वाढविली पाहिजे. शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही पक्ष एकदिलाने निवडणूक लढले. त्यामुळे निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्याबद्दल मी राष्ट्रवादीतल्या सहकार्‍यांचेही आभार मानतो. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत आपण सर्वांनी विजयश्री खेचून आणल्याचेही ते म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.