सातारा - राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे शुक्रवारी (दि. १६ डिसेंबर) दुपारी कराड (Karad) दौऱ्यावर येत आहेत. शिवाजी स्टेडियमवर होणाऱ्या विजय दिवसाच्या मुख्य सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.
यंदा रौप्य महोत्सवी सोहळा - बांगला मुक्ती लढ्यातील भारतीय सेनेच्या विजयाप्रित्यर्थ गेली चोवीस वर्षे कराडमध्ये विजय दिवस साजरा करण्यात येत आहे. यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने विजय दिवस समारोह समितीतर्फे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
शिवाजी स्टेडियमवर प्रात्यक्षिकांचा थरार - सैन्य दलातील जवानांच्या थरारक कसरतींचा थरार शुक्रवारी शिवाजी स्टेडियमवर अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये पोलीस पथकांचे बॅंड वादन, मल्लखांबावरील कवायती, डेअर डेव्हिल्स आणि आकाशगंगा पथकाच्या हवाई कसरतींचा समावेश आहे.