ETV Bharat / state

वर्‍हाडातील 13 जण कोरोनाबाधित; पाटणमधील विहेगाव आठ दिवस बंद

लग्नासाठी गेलेल्या पाटण तालुक्यातील विहे गावातील 85 जणांपैकी 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील 72 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामुळे विहेगाव आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि ग्राम दक्षता समितीने घेतला आहे.

Vihegaon in Patan closed for eight days as 13 people were found corona positive
13 जण कोरोनाबाधित आढल्यामुळे पाटणमधील विहेगाव आठ दिवस बंद
author img

By

Published : Mar 14, 2021, 2:25 AM IST

कराड (सातारा) - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे विवाहासाठी गेलेल्या पाटण तालुक्यातील विहे गावातील 85 जणांपैकी 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील 72 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामुळे विहेगाव आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि ग्राम दक्षता समितीने घेतला आहे.

पाटण तालुक्यात उडाली खळबळ-

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे लग्नासाठी दिनांक 27 फेब्रुवारी रोजी विहे गावातून दोन ट्रॅव्हल्स गेल्या होत्या. दोन्ही ट्रॅव्हल्समधून 80 ते 85 लोक प्रवास करत होते. लग्न समारंभ उरकून गावी आल्यानंतर एकाला 3 आणि 4 मार्च रोजी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर संपर्कात आलेल्या इतरांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले. त्यातील तब्बल 13 जण कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली.

तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी विहे गावाला दिली भेट-

विहे गावात एकावेळी 13 जण कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी 72 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. पाटण तालुक्यात एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले आहे. पाटणचे तहसिलदार योगेश्वर टोंपे यांनी विहे गावाला भेट दिली. तसेच लग्नाला गेलेल्या ट्रॅव्हल्समधील सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्याची सूचना त्यांनी आरोग्य विभागाला केली आहे. त्यानुसार सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

विहे परिसर कंटन्मेंट झोन घोषित-

दरम्यान, गावात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण सापडल्याने ग्रामदक्षता समितीने अत्यावश्यक सेवा वगळून दिनांक 20 मार्च पर्यंत विहेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा- पाच टक्के मुंबईकर इतरांना आणत आहेत अडचणीत, पालिकेच्या नावाने खोटे व्हिडिओ व्हायरल - महापौर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.