ETV Bharat / state

Warkari Accident : विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांची जीप पलटी; चालकाचा मृत्यू, पाच जण गंभीर - वारकऱ्यांच्या गाडीला अपघात

साताऱ्यातील माण तालुक्यात भाविकांची बोलेरो जीप पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जीपमधील सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमी कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावचे रहिवासी आहेत. यातील चालक कल्याण भोसले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 29, 2023, 12:20 PM IST

Updated : Jun 29, 2023, 2:04 PM IST

सातारा - पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या कोरेगाव तालुक्यातील भाविकांच्या बोलेरो गाडीला माण तालुक्यातील लोधवडेजवळ भीषण अपघात झाला आहे. गाडी पलटी होऊन झालेल्या या अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना गोंदवले येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे.

भाविकांची बोलेरो जीप पलटी - कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावातील आठ भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी बोलेरो जीपमधून पंढरपूरकडे निघाले होते. गुरूवारी सकाळी लोधवडे (ता. माण) गावाजवळ भाविकांची बोलेरो जीप (क्र. एम. एच. 11 बी. एच. 0896) पलटी झाली. कल्याण भोसले, अण्णा गाढवे, पप्पू भिसे, दादासो थोरात, सागर भोसले, विजय माने, श्रीमंत पवार आणि रुद्र भोसले, असे आठ जण गाडीतून प्रवास करत होते. या अपघातात गाडीतील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळी पोलिसांची धाव- भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडीतील जखमींना तातडीते गोंदवले ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना 108 रूग्णवाहिकेतून अधिक उपचारासाठी अन्यत्र पाठविण्यात आले. सर्व जखमी हे कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी गावचे रहिवासी आहेत.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात? - भाविकांच्या गाडीला झालेला अपघात हा रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या रस्त्यातील उंच-सखलपणामुळे वेगात असणार्‍या वाहनांवरील चालकाचा ताबा सुटून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वीदेखील या रस्त्यावर असे अपघात झालेले आहेत. त्यामुळे रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

राज्यभरात आज आषाढीचा उत्साह - आषाढी एकादशीनिमित्ताने आज राज्यभरात उत्साह आहे. राज्यातील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातमध्ये सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तसेच एकादशीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. Ashadhi Ekadashi 2023: बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे- मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे
  2. Ashadhi Wari 2023: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; नगर जिल्ह्यातील काळे दांपत्य ठरले मानाचे वारकरी

Last Updated : Jun 29, 2023, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.