ETV Bharat / state

कराड दक्षिणमधून उंडाळकर पुत्र आज अर्ज दाखल करणार - udaysinh undalkar

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह उंडाळकर हे शुक्रवारी कराड दक्षिणमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अ‍ॅड. उदयसिंह उंडाळकर
author img

By

Published : Oct 3, 2019, 11:33 PM IST

सातारा - कराड दक्षिणचे सलग ३५ वर्षे आमदार विवीध खात्यांचे मंत्रीपद भूषवलेले विलासकाका उंडाळकर यांचे सुपुत्र व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह उंडाळकर हे शुक्रवारी कराड दक्षिणमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. शक्तिप्रदर्शन टाळून साध्या पध्दतीने अर्ज दाखल करण्याचा निर्णय उंडाळकरांच्या रयत संघटनेने जाहीर केला आहे.

हेही वाचा - राज्यात भाजप व शिवसेनेच्या विरुद्ध जनतेचा मोठा क्रोध : दिलीप वळसे-पाटील

कराड दक्षिणमधील काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार अनुक्रमे पृथ्वीराज चव्हाण व अतुल भोसले यांनी अर्ज दाखल केला. दोघांनीही प्रचार शुभारंभावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आता उदयसिंह पाटील यांच्या होणार्‍या शक्तिप्रदर्शनाकडे कराड दक्षिणचे लक्ष लागून आहे. मात्र, ते साध्या पद्धतीने अर्ज दाखल करणार आहेत. शुक्रवारी सकाळी अर्ज दाखल केल्यानंतर सायंकाळी कराड तालुक्यातील वींग गावात उंडाळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे.

तसेच होणाऱ्या सभेत माजी मंत्री विलासकाका उंडाळकर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेस आणि भाजप उमेदवारांच्या सभांना झालेली गर्दी पाहता त्या सभांना झालेल्या गर्दीच्या तोडीस तोड गर्दी जमवून हम भी कुछ कम नही, हे दाखविण्यासाठी उंडाळकरांची रयत संघटना सज्ज झाली आहे. मात्र, इतिहास सांगतो की, गर्दी दाखवणे हे विलासकाका उंडाळकरांना आवडत नाही. त्यांच्या राजकीय चाली गुप्त असतात. तरीही सध्याच्या राजकीय वातावरणात त्यांनाही विरोधकांना आपल्या ताकदीचे प्रदर्शन करावे लागणार आहे.

हेही वाचा - नितेश राणेंचा अखेर भाजप प्रवेश; नारायण राणे प्रवेशाच्या प्रतीक्षेत

Intro:कराड : कराड दक्षिणचे सलग 35 वर्षे आमदार आणि सहकार, विधी, न्याय, पुनर्वसन, दुग्धविकास, पशुसंवर्धन, यासारख्या खात्यांचे मंत्रीपद भूषविलेले लोकनेते विलासकाका उंडाळकर यांचे सुपूत्र व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे शुक्रवारी कराड दक्षिणमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शक्तीप्रदर्शन टाळून साध्या पध्दतीने अर्ज दाखल करण्याचा निर्णय उंडाळकरांच्या रयत संघटनेने जाहीर केला आहे.
Body:कराड दक्षिणमधील काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार अनुक्रमे पृथ्वीराज चव्हाण व डॉ. अतुल भोसले यांनी अर्ज दाखल करताना आणि प्रचार शुभारंभावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आता उदयसिंह पाटील यांच्या होणार्‍या प्रचार शुभारंभाच्या शक्तीप्रदर्शनाकडे कराड दक्षिणचे लक्ष लागून आहे. शुक्रवारी सकाळी अर्ज दाखल केल्यानंतर सायंकाळी कराड तालुक्यातील विंग गावात अ‍ॅड. पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. तसेच त्या सभेत माजी मंत्री विलासकाका उंडाळकर काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. काँग्रेस आणि भाजप उमेदवारांच्या सभांना झालेली गर्दी पाहता त्या सभांना झालेल्या गर्दीच्या तोडीस तोड गर्दी जमवून हम भी कुछ कम नही, हे दाखविण्यासाठी उंडाळकरांची रयत संघटना सज्ज झाली आहे. वास्तविक, भपका आणि गर्दी दाखविणे हे विलासकाका उंडाळकरांना आवडत नाही. त्यांच्या राजकीय चाली सुप्त आणि गुप्त असतात. तरीही सध्याच्या राजकीय वातावरणात त्यांनाही विरोधकांना आपल्या ताकदीचे प्रदर्शन करावे लागणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.