ETV Bharat / state

शिवाजी महाराजांच्या विचाराने मोठ्या संकटांचा सामना करण्याचे बळ - उदयनराजे - udayanraje bhosle on chhatrapati shivaji maharaj thoughts

उदयनराजे भोसले मित्र समुहाकडून गोलु उर्फ सचिन साळुंखे यांनी आयोजित केलेल्या कोविड योद्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, सातारचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, जिल्हापरिषदेचे माजी सदस्यबाळासाहेब गोसावी, गोलु उर्फ सचिन साळुखे आदी उपस्थित होते.

udayanraje bhosle on chhatrapati shivaji maharaj thoughts
उदयनराजे
author img

By

Published : Jul 12, 2020, 11:41 AM IST

सातारा - युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्रालाच नव्हे तर जगाला सर्वधर्मसमभाव आणि माणुसकीचे जे विचार
दिले आहेत. ते आत्मसात करुन, त्या विचारांवर आपण सर्वांनी वाटचाल केली तर कोविड-१९ च नव्हे तर आणखी मोठ्या संकटांचा सामना करण्याचे धारिष्टय आणि बळ आपल्याला मिळेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

उदयनराजे भोसले मित्र समुहाकडून गोलु उर्फ सचिन साळुंखे यांनी आयोजित केलेल्या कोविड योद्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, सातारचे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, जिल्हापरिषदेचे माजी सदस्य
बाळासाहेब गोसावी, गोलु उर्फ सचिन साळुखे आदी उपस्थित होते.

कोणताही उपचार नसलेल्या या कोरोना संसर्गजन्य रोगाने सर्वत्र हाहाःकार मांडला असताना, गरजु व्यक्तींना लागेल ती मदत आपणासारख्या कोविड योद्यांमुळे मिळाली आहे. आज अन्नधान्य, किराणा साहित्य, औषधे, आदींबरोबरच रक्तदानासारखे उपक्रम राबविल्यानेच रक्ताचा तुटवडा भासला नाही. त्यामुळेच प्रातिनिधीक स्वरुपात आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळा, निश्चितच वेगळा आणि आपलेपणाचा आहे.

यावेळी संतोष कांबळे यांनी कविता सादर केली. यशवंतराव गायकवाड, बाळासाहेब गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात सुमारे ‍१५ व्यक्ती व संस्थांचा झाडाचे रोप व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षय मतकर, जितेंद्र खानविलकर, काका धुमाळ, इर्षाद बागवान, शैलेश चव्हाण आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.