ETV Bharat / state

ठरलंय..! उदयनराजे भोसले राज्यसभेवर?

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पाटील यांनी तब्बल 1 लाख मतांनी उदयनराजे भोसले यांचा पराभव केला होता. यामुळे सलग 3 वेळा राष्ट्रवादीकडून निवडून येणारे उदयनराजे भोसले पराभूत झाले होते. त्यांना भाजपकडून राज्यसभेवर घेण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे समजत आहे.

Udayanraje Bhosale
उदयनराजे भोसले
author img

By

Published : Feb 4, 2020, 11:32 AM IST

सातारा - माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले यांची राज्यसभेवर निवड होण्याची शक्यता आहे. याबाबत तशी चर्चा सुरू आहे. येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण 19 जागांपैकी 7 खासदार हे निवृत्त होणार आहेत.

हेही वाचा - नरवीर 'तान्हाजी मालुसरे' यांच्य‍ा कोंढाणा रणसंग्राम‍ाची ३५० वर्षपूर्ती

राज्यसभेचे महाराष्ट्रात एकूण 19 खासदार आहेत. त्यापैकी 7 खासदार 2 एप्रिल 2020 ला रिक्त होणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची तयारी भाजपने केली असल्याचे सांगितले जात आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन दिल्लीच्या तख्ताने उदयनराजेंचे हात बळकट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा - महाबळेश्वरमध्ये लवकरच स्ट्रॉबेरीचे संशोधन केंद्र उभारणार - मुख्यमंत्री

अमर साबळे यांच्या जागेवर उदयनराजेंना संधी दिली जाऊ शकते. परंतु, महाराष्ट्रात भाजपची राजकीय ताकद वाढवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांना उदयनराजेंचे हात बळकट करण्याची गरज वाटत आहे. त्याचबरोबर युवा वर्ग व मराठा मतदार आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उदयनराजेंना खासदारकी दिली जाण्याची शक्यता आहे.

Intro:सातारा साताऱ्याचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची राज्यसभेवर निवड करण्याबाबतचा विचार झाला असल्याचे बोलले जात आहे. येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण १९ जागांपैकी ७ खासदार हे निवृत्त होणार आहेत.

Body:राज्यसभेचे महाराष्ट्रात एकूण १९ खासदार आहेत. त्यापैकी ७ खासदार २ एप्रिल २०२० रोजी रिक्त होणार आहेत. साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपने केली असल्याचे सांगितले जात आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची वर्णी लागणार असूनत्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन दिल्लीच्या तख्ताने छत्रपती उदयनराजे यांचे हात बळकट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सातारा पोट लोकसभा निवडणुकीत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पाटील यांनी तब्बल एक लाख मतांनी केला होता. यामुळे सलग तीन वेळा राष्ट्रवादी कडून निवडून येणारे छत्रपती उदयनराजे भोसले पराभूत झाले होते. त्यांना भाजपाकडून राज्यसभेवर घेण्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे समजते आहे.

अमर साबळे यांच्या जागेवर छत्रपती उदयनराजेंना संधी दिली जाऊ शकते. परंतु महाराष्ट्रात भाजपची राजकीय ताकद वाढविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांना छत्रपती उदयनराजेंचे हात बळकट करण्याची गरज वाटत आहे. त्याचबरोबर युवा वर्ग व मराठा मतदार आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उदयनराजेंना खासदारकी दिली जाण्याची शक्यता आहे.

Conclusion:सातारा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.