ETV Bharat / state

उदयनराजेंचे मताधिक्य का आणि कुठे घटले? अशी आहे मतांची गोळा बेरीज - सातारा

सातारा लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये सातारा, कराड दक्षिण, कराड उत्तर, वाई- खंडाळा, महाबळेश्वर आणि पाटण यांचा समावेश आहे. ४ मतदारसंघांत राष्ट्रवादीचे आमदार असून एका मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे विविध मतदारसंघनिहाय आघाडीच्या आणि महायुतीच्या उमेदवारांना किती मते पडली? ते जाणून घेऊया.

खासदार उदयनराजे भोसले
author img

By

Published : May 25, 2019, 3:07 PM IST

सातारा - खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदार संघातून तब्बल सव्वा लाख मताधिक्क्याने निवडून आले आहेत. मात्र, गेल्या २ लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता हे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. मोदी लाटेत साडेतीन लाखांचे मताधिक्क्य उदयनराजे भोसले यांनी घेतले होते. मात्र, यावेळी भाजप सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष असतानादेखील उदयनराजे भोसले यांची मते कमी झाल्याने आत्मपरीक्षण करण्याचा कौल दिला जात आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये सातारा, कराड दक्षिण, कराड उत्तर, वाई- खंडाळा, महाबळेश्वर आणि पाटण यांचा समावेश आहे. ४ मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असून एका मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार आहे. त्यामुळे विविध मतदारसंघनिहाय आघाडीच्या आणि महायुतीच्यया उमेदवारांना किती मते पडली? ते जाणून घेऊया.

सातारा विधानसभा मतदारसंघ -
उदयनराजे भोसले यांना मिळालेली मते - ९८ हजार ९०८
महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना ६४ हजार ८९५
अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये घरच्या मतदारसंघाकडून मोठ्या लिडची अपेक्षा असताना सातारा मतदारसंघातील जनतेने मतदानाबाबत खासदार उदयनराजे यांची निराशाच केलेली पाहायला मिळाली. मनोमिलन कार्यकर्ते आणि जनतेच्या पातळीवर रुजवलेली मुद्दे दोन्ही नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभेच्या गेल्या २ निवडणुकांमध्ये सातारा मतदारसंघातून उदयनराजेंना भरघोस मताधिक्य मिळाले होते. मात्र, यावेळी नरेंद्र पाटील यांना मागे टाकायला सातव्या फेरीची वाट पाहावी लागली. त्यानंतर मताधिक्क्य वाढत गेले.

कराड उत्तर विधानसभा -
उदयनराजे भोसले - १ लाख ४४ हजार ३७
नरेंद्र पाटील - ६५ हजार ४७४
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना उत्तर कराड विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात कराड तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटासह सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्यातील काही भागांचा समावेश होतो. आमदार बाळासाहेब पाटील यांनी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. उदयनराजे भोसले यांचा पहिला कार्यकर्ता मेळावा आणि संमती घेऊन विजयाची वाटचाल सुरू केली होती. उदयनराजेंच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांनीही सक्रीय सहभाग घेतला. त्यामुळे उदयनराजे यांना मताधिक्क्य मिळणे शक्य झाले आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ -
उदयनराजे भोसले - ८१ हजार ८२९
नरेंद्र पाटील - ८६ हजार ६५७
निवडणुकीच्या काळात दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात निर्माण केलेल्या वातावरणाचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला नाही. जनतेचे मतपरिवर्तन करण्यात भाजप-शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र, त्या वातावरणामुळे मतदार ठराविक विचारसरणीत वाहून जाऊ नये यासाठी काँग्रेसने केलेली पेरणी उदयनराजेंच्या विजसाठी उपयुक्त ठरली. या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले सक्रिय होते. पण या मोठ्या पदांच्या नेत्यांचा फारसा उपयोग झाला नाही असेच म्हणावे लागेल. शिवसेनेचे सायलेंट राहिलेले कार्यकर्ते येथे जॉइंट किलर ठरले. दक्षिणेतील कराड शहर एक ठराविक विचारसरणीचे आहे. त्यामुळे शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांना उजव्या विचारांची अनेक मते मिळतील, असे वाटले जात होते. मात्र, प्रत्यक्षात त्याचा फार मोठा प्रभाव झालेला नाही.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ -
उदयनराजे भोसले - १ लाख ४३८
नरेंद्र पाटील - ७० हजार २६
या मतदारसंघात मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन ते तीन वेळा सभा घेतल्या. यावेळी काँग्रेसचे नेते माजी आमदार मदन भोसले यांना भाजपात प्रवेश देऊन वाई-खंडाळा-महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यांनी उदयराजे भोसले यांना महत्त्वपूर्ण आघाडी दिली आहे. याठिकाणी मदन भोसले गट हा शिवसेना-भाजपबरोबर असल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, याचा परिणाम या विधानसभा मतदारसंघात झालेला दिसत नाही. या मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे वाईकर पुन्हा राजे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत, असे बोलले तरी वावगे ठरणार नाही.

पाटण विधानसभा मतदारसंघ -
उदयनराजे भोसले ६७ हजार ७३९
नरेंद्र पाटील - ८५ हजार ४४६
शिवसेनेचे नरेंद्र पाटील तालुक्याचे भूमिपूत्र आहेत. तसेच पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांना चांगले मताधिक्क्य मिळाले, अशी आशा होती. पण आकडेवारी पाहता येथे पारंपारिक देसाई आणि पाटणकर जंगी सामना पाहावयास मिळाला. त्यामध्ये सत्यजीतसिंह पाटणकर यांनी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन आमदार शंभूराज देसाई यांना कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. भूमिपूत्र म्हणून येथील जनतेने नरेंद्र पाटील यांना झुकते माप दिले हे देखील नाकारून चालणार नाही. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युवा नेते सत्यजितसिंह यांचा आमदार देसाई यांनी अठरा हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला होता. नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील या तालुक्यात प्रचार करत होत्या. काही दिवसानंतर शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई प्रचारात सक्रिय झाले. नरेंद्र पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवला होता. तो उत्साह नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर दिसला नाही.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघ -
उदयनराजे भोसले - १ लाख २७४
नरेंद्र पाटील - ६९ हजार ५५८
या मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना मोठी आघाडी मिळाली आहे. नरेंद्र पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी कोरेगावमध्ये जोरदार सभा घेतल्या होत्या. मात्र, उदयनराजे यांना आघाडी मिळवून देण्यात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह पाहायला मिळत आहे. दुसरीकडे प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला असतानाही नरेंद्र पाटील यांनी मिळवलेली मते दुर्लक्षित करून चालणार नाहीत.

Intro:सातारा लोकसभा मतदार संघात खासदार उदयनराजे भोसले तब्बल सव्वा लाख मताच्या मताधिक्क्याने निवडून आले आहेत. मात्र मागील दोन लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता हे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. मोदी लाटेत देखील साडेतीन लाखांचे मताधिक्क्य उदयनराजे भोसले यांनी घेतले होते. मात्र यावेळी भाजप सरकारच्या विरोधात असणारा असंतोष मोठ्या प्रमाणावर असताना देखील उदयनराजे भोसले यांना मतदान भेटले नसल्याने आत्मपरीक्षण करण्याचा कौल दिला आहे.

Body:सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये सातारा, कराड दक्षिण, कराड उत्तर, वाई- खंडाळा- महाबळेश्वर आणि पाटण या मतदारसंघात चार आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असून एक काँग्रेस व एक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे विविध मतदारसंघात उदयनराजे भोसले व नरेंद्र पाटील यांना मिळालेल्या मतदानाची माहिती तसेच या मतदारसंघातील सध्याची परिस्थिती याबद्दल माहिती घेणार आहोत.

*सातारा विधानसभा मतदारसंघ
उदयनराजे भोसले 98908
नरेंद्र पाटील 64895
अत्यंत चुरशीच्या लढती मध्ये घरच्या मतदारसंघाकडून मोठ्या लिडची अपेक्षा असताना. सातारा मतदारसंघातील जनतेने मतदाना बाबत खासदार उदयनराजे यांची निराशाच केली व त्यानंतरचे मनोमिलन कार्यकर्ते व जनतेच्या पातळीवर रुजवलेली मुद्दे. दोन्ही नेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा का...? लोकसभेच्या मागिल दोन निवडणुकांमध्ये सातारा मतदारसंघातून उदयनराजे भरघोस मताधिक्य मिळाले. मागील निवडणुकीत तर तब्बल 80 हजारांचे उदयनराजेंना मताधिक्य मिळाले होते. उदयनराजे सातारा विधानसभा मतदार संघातच तिच्यावर विश्वास होता मात्र या ठिकाणी निराशा मिळाली आहे. नरेंद्र पाटील यांना मिळालेले मताधिक्य मागे टाकायला सातवी फेरी यावी लागली. त्यानंतर मताधिक्क्या वाढत गेले परंतु मागील आकडेवारी काही गाठता आले नाही.

*कराड उत्तर विधानसभा
उदयनराजे भोसले 104437
नरेंद्र पाटील 65474
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना उत्तर कराड विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक मताधिक्य देत राष्ट्रवादीचा भक्कम असल्याचे सिद्ध केले आहे. या मतदारसंघात कराड तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटासह सातारा, कोरेगाव, खटाव तालुक्यातील काही भागांचा समावेश होतो. आमदार बाळासाहेब पाटील यांनी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. उदयनराजे भोसले यांचा पहिला कार्यकर्ता मेळावा व संमती घेऊन विजयाची वाटचाल सुरू केली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी व काँग्रेसला बरोबर घेऊन एकत्रित प्रचार परिणामकारक ठरला उदयनराजेंच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांनीही सक्रीय सहभाग घेतला. त्यामुळे उदयनराजे यांची मताधिक्क्याला हातभार लागला आहे.

*कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ
उदयनराजे भोसले 81829
नरेंद्र पाटील 86657
सातारा लोकसभा निवडणुकीच्या काळात दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात निर्माण केलेले वातावरण मतदानात परिवर्तन करण्यात भाजप-शिवसेनेला म्हणावे अशे यश मिळालं नाही. पण त्या वातावरणाचा व ठराविक विचारसरणीत मतदार वाहून जाऊ नये म्हणून काँग्रेसने केलेली पेरणी उदयनराजेंच्या विषयासाठी उपयुक्त ठरली. असेच काहीसे विश्लेषण या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दक्षणे साठी करावी लागेल. या मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण तसेच तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले सक्रिय होते. पण या मोठ्या पदांच्या नेत्यांचा फारसा उपयोग झाला नाही. असेच म्हणावे लागेल प्रचारात शिवसेना, भाजपा, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर होते. शिवसेनेचे सायलेंट राहिलेली कार्यकर्ते येथे जॉइंट किलर ठरले. दक्षिणेतील कराड शहर एक ठराविक विचारसरणीचे आहे. असे भासवले जात होते. त्यामुळे शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांना उजव्या विचारांची अनेक मते मिळतील असे वाटले जात होते. मात्र प्रत्यक्षात त्याचा फार मोठा प्रभाव झालेला नाही.

*वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ
उदयनराजे भोसले 100438
नरेंद्र पाटील 70026
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपाची ताकद असलेल्या विधानसभा मतदार संघाकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. या मतदारसंघात मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दोन ते तीन वेळा सभा देखील घेतल्या. यावेळी काँग्रेसचे नेते माजी आमदार मदन भोसले यांना भाजपात प्रवेश घेऊन वाई-खंडाळा-महाबळेश्वर ची ताकद राष्ट्रवादीची कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी पुन्हा आपली ताकद दाखवून दिले आहे. त्यांनी उदयराजे भोसले यांना महत्वपूर्ण आघाडी दिली आहे. याठिकाणी मदन भोसले गट हा शिवसेना-भाजपबरोबर असल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र याचा परिणाम या विधानसभा मतदारसंघात झालेला दिसत नाही. या मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना चांगली मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे वाईकर पुन्हा राजे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. असे बोलले तरी वावगे ठरणार नाही.

*पाटण विधानसभा मतदारसंघ
उदयनराजे भोसले 67739
नरेंद्र पाटील 85446
लोकसभा निवडणुकीत सर्वांच्याच नजरा पाटण मतदारसंघाकडे होत्या. शिवसेनेचे नरेंद्र पाटील तालुक्याचे भूमिपुत्र व पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची सत्ता असलेले नरेंद्र पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले अशी अशा सर्वाँणा होती. पण या निवडणुकीच्या निमित्ताने आकडेवारी पाहता येथे पारंपारिक देसाई व पाटणकर जंगी सामना पाहावयास मिळाला. त्यामध्ये सत्यजीतसिंह पाटणकर यांनी आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवुम आमदार शंभूराज देसाई यांना कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रयत्न केलेले दिसत आहे. भूमिपुत्र म्हणून येथील जनतेने नरेंद्र पाटील यांना झुकते माप दिले हे देखील नाकारून चालणार नाही. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत युवा नेते सत्यजितसिंह यांचा आमदार देसाई यांनी अठरा हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला होता. याचा विचार व राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवसेनेचे उमेदवार मिळालेली नरेंद्र पाटील यांना तालुक्यातील भूमिपुत्राला चांगले मताधिक्य मिळेल असा अंदाज सर्वांचा होता. साधारण आठ हजार मतांच्या फरकाने घडलेही तसेच प्रचाराला सुरुवात झाली. तेव्हा नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील या तालुक्यावर प्रचार करत होत्या. काही दिवसानंतर शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई प्रचारात सक्रिय झाले. नरेंद्र पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर देसाई गटाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दाखवला होता. तो उत्सह नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर दिसला नाही. असेही दिसून आले.

*कोरेगाव विधानसभा मतदारसंघ
उदयनराजे भोसले 100274
नरेंद्र पाटील 69558
या मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना मोठी आघाडी मिळाली आहे. नरेंद्र पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दिग्गज नेत्यांनी कोरेगाव मध्ये जोरदार सभा ठेवलेली असतानाही राष्ट्रवादीने उदयनराजे यांना आघाडी मिळवून देण्यात आमदार शशिकांत शिंदे यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह पसरला आहे. दुसरीकडे प्रचारासाठी अत्यंत कमी कालावधी मिळालेले असतानाही नरेंद्र पाटील यांनी मिळवलेली मते दुर्लक्षित करून चालणार नाहीत. म्हणून निवडणूक जाहीर होताच उदयनराजे यांनी निवडणुकीच्या प्रचारात लगेच प्रारंभ केला. त्यांच्यासाठी आमदार शिंदे यांनी सर्वप्रथम कोरेगावात मेळावा घेऊन वातावरण निर्मिती केली. दरम्यान उदयनराजे यांची कोरेगाव मतदारसंघातील प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली होती. तर सेनेचे उमेदवार ठरलेले नव्हता. त्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यान आमदार शिंदे यांच्या नियोजनातून उदयनराजे यांची प्रचार यंत्रणा राबवली जात होती. त्यात कोरेगाव मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे पदाधिकारी सक्रिय सहभागी झाले होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.