सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या 'जलमंदिर पॅलेस' या निवासस्थानी दसर दिनानिमित्त भवानी मातेच्या शाही तलवारीचे विधिवत पूजन केले. यावेळी देवीची आरती देखील करण्यात आली.आरतीनंतर श्री भवानी माता मंदिरातून या भवानी तलवारीची पारंपरिक वाद्य वाजवत पालखीतून मिरवणूक काढण्यात आली आहे.
हेही वाचा - 'मी पळून न जाता बाजीप्रभूप्रमाणे खिंड सांभाळतोय'
सातारा शहरातील राजपथावरून ही मिरवणूक काढली गेली. अनेक वर्षांपासून सिमोल्लंघनाचा सोहळा साताऱ्यात पार पडत आहे. हा सोहळा पाहण्यासाठी आणि या तलवारीचे दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
हेही वाचा - काँग्रेसच्या प्रचारात 'तन मन धन'से उतरणार मनसे, 'या' कार्यकर्त्यांनी घेतला निर्णय