ETV Bharat / state

सोना अलॉईज मारहाण व खंडणी प्रकरण; छ. उदयनराजेंसह ११ जणांची निर्दोष मुक्तता - udayanraje freed by session court

जवळपास तीन वर्षानंतर लागलेल्या या निकालाकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर बोलवून आपणास बेदम मारहाण करत २४ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार जैन यांनी २३ मार्च २०१७ रोजी सातारा शहर पालीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार माजी खासदार उदयनराजे यांच्यासह १२ जणांवर मारहाण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

satara
उदयनराजें
author img

By

Published : Jan 27, 2020, 6:20 PM IST

Updated : Jan 27, 2020, 7:10 PM IST

सातारा- खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या सोना अलॉईज या कंपनीचे राजकुमार जैन यांना मारहाण करण्यात आली होती. त्याचबरोबर जैन यांना २४ लाखांची खंडणी देखील मागण्यात आली होती. या प्रकरणी साताऱ्याचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह तब्बल १२ जणांची जिल्हा सत्र न्यायालयाने मुक्तता केली आहे. सबळ पुराव्यां अभावी न्यायालयाने वरील सर्वांना निर्दोष मुक्त केले आहे.

जवळपास तीन वर्षानंतर लागलेल्या या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर बोलवून आपणास बेदम मारहाण करत २४ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार जैन यांनी २३ मार्च २०१७ रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार माजी खासदार उदयनराजे यांच्यासह १२ जणांवर मारहाण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात अर्ज केले होते. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी उदयनराजे यांनी स्वत: अटक करून घेतली होती.

सोना अलॉईज प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. उदयनराजे विरुद्ध रामराजे असा रंग या राजकीय संघर्षाला चढला होता. शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल असताना उदयनराजे यांनी साताऱ्यात पदयात्रा काढल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडील वकिलांनी युक्तिवाद केले. यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी माजी खासदार उदयनराजे यांच्यासह सर्व १२ जणांची निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा- हरियाणा राज्यातील उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची निढळ गावाला भेट

Intro:सातारा : खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील औद्योगिकवसाहतीत असलेल्या सोना अलॉईज या कंपनीचे राजकुमार जैन यांना मारहाण करूनत्यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणातून सातारचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह तब्बल १२ जणांची सातारा सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.
Body:जवळपास तीन वर्षानंतर लागलेल्या या निकालाकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर बोलवून आपणास बेदम मारहाण करत २४ लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार जैन यांनी २३ मार्च २०१७ रोजी सातारा शहर पालीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार माजी खासदार उदयनराजे यांच्यासह १२ जणांवर मारहाण करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात अर्ज केले होते. तथापि, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी उदयनराजे यांनी स्वत: अटक करून घेतली होती.
सोना अलॉईज प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले होते. उदयनराजे विरूध्द रामराजे असा रंग या राजकीय संघर्षाला चढला होता. सातारा शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल असताना उदयनराजे यांनी साताऱ्यात पदयात्रा काढल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे सातारा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणी
सातारा येथील सत्र न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडील वकिलांनी युक्तिवाद केले. यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी माजी खासदार उदयनराजे यांच्यासह सर्व १२ जणांची निर्दोष मुक्तता केली.

Conclusion:निकालानंतर साताऱ्यात जल्लोष
या प्रकरणात उदयनराजे यांना सातारकरांकडून प्रचंड सहानुभूती मिळाली होती. त्यांच्या अटक प्रकरणावेळी हजारो तरूण रस्त्यावर उतरले होते. पण अटकेनंतर काही वेळातच न्यायालयाने त्यांना जामीन दिला आणि उदयनराजे पोवई नाक्यावर येऊन तरूणाईमध्ये मिसळले. त्यामुळे या प्रकरणाकडे उदयनराजे प्रेमींचे लक्ष होते. न्यायालयाने त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केल्याचे वृत्त पसरताच साताऱ्यात त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. यामध्ये तरूणांचा सहभाग लक्षणीय होता.
Last Updated : Jan 27, 2020, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.