ETV Bharat / state

..म्हणून उदयनराजे करणार नाहीत वाढदिवस साजरा

author img

By

Published : Feb 22, 2020, 11:18 PM IST

उदयनराजे यांचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. या दिवशी उदयनराजे यांच्या 'जलमंदीर' या निवासस्थानाच्या प्रांगणात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी लोटते. जिल्ह्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील म‍ान्यवर यावेळी आवर्जून हजेरी लावतात. मात्र, यंदा स्वत: उदयनराजेंनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

udayanraje bhosale
उदयनराजे भोसले

सातारा - माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे. बळीराजाच्या न थांबणाऱ्या आत्महत्या, सध्याची राज्यातील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेरोजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची व्दिधा मनस्थिती यामुळे वाढदिवस करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

  • आमचा वाढदिवस कोणीही कोणत्याही पध्दतीने साजरा करु नये, त्यापेक्षा गोर-गरिब जनतेच्या आवश्यक गरजांच्या पूर्ती करीता परस्पर मदत करावी अशी आमची आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत. बळीराजाच्या न थांबणा-या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि pic.twitter.com/TkUKta24dX

    — Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उदयनराजे यांचा 24 फेब्रुवारीला वाढदिवस आहे. उदयनराजेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते दरवर्षी विविध उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करतात. यानिमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. सायंकाळी उदयनराजे यांच्या 'जलमंदीर' या निवासस्थानाच्या प्रांगणात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी लोटते. जिल्ह्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील म‍ान्यवर यावेळी आवर्जून हजेरी लावतात. मात्र, यंदा स्वत: उदयनराजेंनीच वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

तसेच शुभेच्छा देखील स्वीकारण्यासही साताऱ्यात नसेन, असे उदयनराजेंनी कळवले आहे. त्याचे कारण सांगताना त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या आत्महत्या काही केल्या थांबलेल्या नाहीत. तसेच सध्याची राजकीय अस्थिर परिस्थिती पहाता, आमचा वाढदिवस साजरा करणे आम्हास उचित वाटत नाही. सबब, आमचा वाढदिवस कोणीही कोणत्याही पध्दतीने साजरा करु नये. त्यापेक्षा गोर-गरिब जनतेच्या आवश्यक गरजांच्या पूर्ती करीता परस्पर त्यांना मदत करावी, असे आवाहन उदयनराजेंनी केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.