सातारा - भाजपाचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांची एक आपल्या खास शैलीसाठी ओळख आहे. त्यांचा तो खास अंदाजा पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. (Damayanti Raje birthday ) त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उदयनराजेंच्या (Udayan Raje Wife Damayanti Raje) या शुभेच्छांची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा
उदयनराजे हे त्यांच्या खास अंदाजासाठी ओळखले जातात. त्यांचे बाईक, कार यावरील प्रेम सर्वश्रूत आहे. दमयंतीराजे यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे ते सोशल मिडीयावर चर्चेय आले आहेत. फेसबूकवर पत्नीला शुभेच्छा देताना लिहिलेल्या पोस्टमध्ये उदयनराजे म्हणाले की, "प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा मोठा वाटा असतो. राजकारण, समाजकारण तसेच आमच्या सुखदुःखात नेहमी मला साथ आणि सोबत देणाऱ्या
सहचारिणी राणीसाहेब आपणास वाढदिवसादिनी अनंत शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा."
दिल्याबद्दत त्यांचे आभार मानले
उदयनराजे आणि दमयंती यांचा विवाह हा २० नोव्हेंबर २००३ रोजी झाला होता. दरम्यान, पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
देताना उदयनराजेंनी राजकारण, समाजकारण तसेच आमच्या सुखदुःखात नेहमी साथ दिल्याबद्दत त्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा - Income Tax Return Extended Date : दिलासा : आयकर भरण्यास मुदतवाढ