सातारा - जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2 हजार 257 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 24 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
50 टक्के रुग्ण एकट्या फलटणमध्ये -
काल आलेल्या बाधितांमधील तब्बल 50 टक्के रुग्ण एकट्या फलटण तालुक्यात आढळले. 955 रुग्ण या तालुक्यात निष्पन्न झाले. तर जावळी 58, कराड 213, खंडाळा 82, खटाव 247, कोरेगांव 126, माण 75, महाबळेश्वर 4, पाटण 90, सातारा 317, वाई 71 व इतर 19 असे आज अखेर एकूण 1 लाख 62 हजार 712 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आहेत. 11 हजार 303 नमूने घेण्यात आले. पैकी 2 हजार 257 बाधित निघाले. जिल्ह्याचे आजचे बाधितांचे प्रमाण 19.97 टक्के इतके आहे.
21 हजार 651 रुग्ण अॅक्टीव्ह -
आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये सातारा 9, कराड 5, खटाव 3 (407), कोरेगांव 2 (311), माण 2, पाटण 1, फलटण 1, वाई 1 यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 616 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 21 हजार 651 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
2 हजार 398 नागरिकांना दिला डिस्चार्ज -
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 2 हजार 398 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.