ETV Bharat / state

Satara Crime : धक्कादायक! सातार्‍यात दोन शाळकरी मुलांची आत्महत्या

author img

By

Published : Mar 22, 2023, 3:43 PM IST

सातारा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. घडली आहे. इयत्ता आठवीत शिकणार्‍या दोन मुलांनी राहत्या घरात आत्महत्या केली आहे. अथर्व बसवराज दोडमणी (रा. अंबेदरे रोड) आणि जितेंद्र जगन वासकळे (रा. कोडोली, सातारा), अशी आत्महत्या केलेल्या मुलांची नावे आहेत. शाहूपुरी आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद झाली आहे.

Satara Crime
आत्महत्या

सातारा : गेल्या काही दिवसात जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रकरण समोर येत आहेत. गोळीबार, हत्या, जीवघेण्या हल्ल्यांनी जिल्हा हादरून गेला असतानाच पालकांची चिंता वाढविणारी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता आठवीत शिकणार्‍या दोन मुलांनी राहत्या घरातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अथर्व बसवराज दोडमणी (रा. अंबेदरे रोड) आणि जितेंद्र जगन वासकळे (रा. कोडोली, सातारा), अशी आत्महत्या केलेल्या मुलांची नावे आहेत. दरम्यान, शाहूपुरी आणि सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद झाली आहे.

शिक्षकाच्या मुलाची आत्महत्या : शाहूपुरीतील अंबेदरे रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या बसवराज दोडमणी यांचा मुलगा अथर्व हा आठवीत शिकत होता. मंगळवारी रात्री त्याने राहत्या घरातच आत्महत्या केली. त्याचे वडीत शिक्षक आहेत. शिक्षकाच्याच मुलाने आत्महत्या केल्याने शैक्षणिक वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे. त्याच्या कुटुंंबात आई, वडील, आजी, भाऊ आहेत. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

शाळकरी मुलाची आत्महत्या : सातारा शहरानजीकच्या कोडोली येथे शाळकरी मुलाने आत्महत्या केल्याची दुसरी घटना समोर आली आहे. जितेंद्र जगन वासकळे, असे त्याचे नाव आहे. रात्री जेवण करून आपल्या खोलीत गेल्यानंतर त्याने आत्महत्या केली. रात्री 11 वाजता ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर कुटुंबीय हादरून गेले. त्यांनी जितेंद्रला तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे .या घटनेमागील कारण समजू शकलेले नाही.

पालकांची चिंता वाढली : शाळकरी मुलांच्या आत्महत्यांमुळे शिक्षक आणि पालकांची चिंता वाढली आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे देखील मुलांच्या जीवनावर मोठा परिणाम होताना दिसत आहेत. सातार्‍यातील घटनांमुळे शाळकरी मुले आणि मोबाईलचा अतिवापर, हा विषय आता ऐरणीवर आला आहे. शिक्षक तसेच पालकांनी मुलांवर आता अधिक लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : Mumbai Crime News: गांधी रुग्णालयातील डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल; बेहिशोबी मालमत्ता केली होती जमा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.