सातारा - वीर कर्नल संतोष महाडिक यांना पाच वर्षांपूर्वी कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना विरमरण आले होते. कुपवाडा जिल्ह्यतील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर हाजी नाका परिसरातील दाट जंगलात दशहतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या 41 राष्ट्रीय रायफलचेते नेतृत्त्व करत होते. त्यांनी या परिसरात सुरू केलेला हमर्दद उपक्रम अव्याहत सुरू आहे. त्यांच्या बलिदानातून लोक प्रेरणा घेतील, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते किशोर काळोखे यांनी केले.
सातारा तालुक्यातील आंबवडे बुद्रुक येथे समर्थ सेवा तरुण मंडळाच्या वतीने आयोजीत वीर कर्नल संतोष महाडिक यांना तसेच काळोशीचे वीर जवान सुरज लामजे यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संतोष महाडिक यांचे भाऊ जयवंत महाडिक, आश्फाक पटेल, विकास कारंडे, राजेश जाधव, मोहन धोंडवड आदी मान्यवर उपस्थित होते.
किशोर काळोखे म्हणाले, छत्रपती शिवरायांनी जे गडकोटांचे वैभव निर्माण केले आहे. ते आपण जोपासले पाहिजे आंबवडे बुद्रुक सारख्या छोट्याश्या गावात प्रत्येक घरात आधुनिक काळातील फिरोज इंदलकर निर्माण झाला आहे. या गावात हुबेहुब गडकिल्यांच्या प्रतिकृती वाखण्याजोग्या आहेत.
कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच कुपवाडमध्ये आजही हमदर्द उपक्रम चालू आहे. यामध्ये शरण येणाऱ्या दहशतवाद्यांना पर्यटन रोजगार उपलबध करुन देण्यात येतो. त्यांच्या मुलांना शिक्षण, क्रिडा, साहीत्य, शेती विषयक मार्गदर्शन देण्यात येते. गडकिल्यांचे वैभव पाहताना शिवरायांचा तेजस्वी इतिहास साकारणारे अंबवडे बुद्रुक हे गाव भागात नावलौकिक मिळवत आहे, असे गौरवोद्गार जयवंत महाडीक यांनी काढले.