ETV Bharat / state

Tourists banned at Vasota fort : वासोटा किल्ल्यावर पर्यटकांना तीन दिवस बंदी, अभयारण्यात आढळल्यास होणार कारवाई

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दि. ३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान तीन दिवस (Tourists banned at Vasota fort for three days) वासोट्या किल्ल्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वासोटा किल्ला अथवा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात आढळून आल्यास कायदेशीर कारवाई (action will be taken) केली जाणार आहे.

Tourists banned at Vasota fort
वासोटा किल्ल्यावर पर्यटकांना तीन दिवस बंदी
author img

By

Published : Dec 27, 2022, 2:10 PM IST

सातारा : काही दिवसांवर न्यू इयर येऊन ठेपला ( New Year Celebration) आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्साहात आहे. लोक नवीन वर्षाचे स्वागत सज्ज आहेत. त्यातही 31 डिसेंबर रोजी शनिवार (31st December Saturday) आणि 01 जानेवारी रोजी रविवार (01st January Sunday) आला आहे. या दोन्ही दिवशी सुट्टी (Weekend two day holiday) असल्याने जवळपास अनेक लोकांनी आपल्या सुट्टया मजेत घालविण्यासाठी आधीच नवीन वर्षात फिरायला जायचा प्लॅन केलेला असणार आहे. तर काही नागरिक जे कामा निमित्त सतत बाहेर असतात. त्यांनी आपला वेळ कुटूंबातील व्यक्तींबरोबर घालविण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार केल्या असेल. पण यावेळे तुम्ही वासोट्या किल्ल्यावर जाऊ शकणार नाही.

पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेता : 30, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी या तिन्ही दिवशी वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद राहणार असल्याचे वनविभागाचा वतीने सांगण्यात आले आहे. नववर्ष स्वागत व सरत्या वर्षाला निरोप यासाठी पर्यटक गर्दी मोठ्या प्रमाणात करत असतात. काही उत्साही पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेता दरवर्षी तीन दिवस किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घातली जाते.

वासोटा किल्ल्याची पर्यटकांना भुरळ : जावळी तालुक्याच्या दुर्गम भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्गसंपन्न गाभा क्षेत्रातील वासोटा किल्ला निसर्गप्रेमी, ट्रेकर्सना भुरळ घालतो. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. वासोटा किल्ला वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने पर्यटकांकडून निसर्गसंपदेला कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

वासोटा किल्ल्यावर पर्यटकांना तीन दिवस बंदी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर दि. ३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान तीन दिवस वासोट्या किल्ल्यावर पर्यटकांना बंदी (Tourists banned at Vasota fort for three days) घालण्यात आली आहे. वासोटा किल्ला अथवा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात आढळून आल्यास कायदेशीर कारवाई (action will be taken) केली जाणार आहे.

बोट चालकांना वाहतूक न करण्याच्या सूचना : बामणोली, तापोळा विभागातील बोट चालकांना कोयना जलाशयात बोटीतून पर्यटक वाहतूक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वासोटा किल्ला परिसरासह अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात कोणी व्यक्ती बेकायदेशीररीत्या आढळून येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बामणोली वन्यजीव वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस (Bamanoli Wildlife Forester Balkrishna Hasbanis) यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.