ETV Bharat / state

कोरोनाचा धसका : महाबळेश्व- पाचगणीत पर्यटकांची संख्या रोडावली

जानेवारी संपताच वाढत्या तापमानामुळे पर्यटकांना महाबळेश्वर-पाचगणीची ओढ लागते. विशेषत: 'विकेंड'ला सातारा जिल्ह्यातील ही दोन्ही थंड हवेची ठिकाणे गर्दीने फुलून जातात. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोनामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.

कोरोनाचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर
कोरोनाचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर
author img

By

Published : Mar 16, 2020, 12:00 AM IST

सातारा - 'कोरोना' विषाणूच्या भीतीमुळे महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे महाबळेश्वर व पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणची पर्यटकांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच या दोन्ही थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, यावेळेस कोरोनामुळे ही संख्या रोडावली आहे.

कोरोनाचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर

कोरोन‍ा विषाणूने महानगरांमध्ये शिरकाव केला आहे. जिल्ह्याची वेस असलेल्या पुण्यापर्यंत हा संसर्ग येऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पुरेशी सतर्कता बाळगली जात असली तरी महानगरांमधील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. जानेवारी संपताच वाढत्या तापमानामुळे पर्यटकांना महाबळेश्वर-पाचगणीची ओढ लागते. विशेषत: 'विकेंड'ला सातारा जिल्ह्यातील ही दोन्ही थंड हवेची ठिकाणे गर्दीने फुलून जातात. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोनामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात १६ रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यात्रा-जत्रा, मॉल, जलतरण तलाव आदी गर्दीच्या ठिकाणांवर प्रशासनाने पायबंद घातल्याने जिल्ह्यातील पर्यटनावर परिणाम जाणवू लागला आहे.

हेही वाचा - वाईत कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदूला बेड्या

महाबळेश्वर-पाचगणीला गुजरात, मुंबई, पुण्याच्या पर्यटकांची संख्या मोठी असते. महानगरांत काळजीचे वातावरण असल्याने पर्यटक 'विकेंड'ला सुद्धा घराबाहेर पडायला घाबरत आहेत. जलविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरच्या वेण्णा तलावावर तुरळक पर्यटक दिसत होते. काही पर्यटकांनी लॉजचे अगाऊ केलेले बुकिंग रद्द केल्याचे लॉज मालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. पाचगणी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मेहुल पुरोहित यांनी पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचे सांगितले. तथापि, जिल्हाधिक‍ऱयांच्या सुचनांप्रमाणे सर्व व्यापारी वर्ग कोरोना विषाणूबाबत पुरेशी स्वच्छतेची काळजी घेत असल्याने या दोन्ही शहरांत काळजी करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.