सातारा - पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी टोल नाक्यावर बुधवारी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आंदोलन केले होते. याप्रकरणी आमदार भोसले यांच्यासह 80 जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कार्यकर्त्यांनी जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावर सुविधा द्याव्यात, रस्त्यावरचे खड्डे बुजवावेत, अर्धवट पुलांची कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशी शहरवासियांची मागणी आहे. मागणीसाठी नेटकऱ्यांनी जोरदार आवाज उठवला आहे. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे संतापाची लाट आहे. जिल्हा प्रशासनही बैठका घेण्यापलीकडे गेले नाही. त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत टोलनाक्यावर सनदशीरमार्गाने हल्लाबोल केला होता.
हेही वाचा - औरंगाबादच्या निराला बाजारातील हुक्का पार्लरवर छापा; 14 जण अटकेत
'रस्ता आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा' अशी घोषणाबाजी करत टोल नाक्यावर मोर्चा गेला होता. तसेच 'सुविधा द्या अन्यथा टोल वसुली बंद करा' म्हणत शिवेंद्रसिंहराजेंनी टोलच्या मार्गीकेवर उभे राहून वाहनचालकांना गुलाबपुष्प देत गांधीगिरी केली होती. यानंतर जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत 80 जणांवर गुन्हा दाखल केला.