ETV Bharat / state

कोयना धरणाच्या पाणी वाटप कराराच्या तांत्रिक वर्षाचा आज शेवटचा दिवस! २० टीएमसी पाणीसाठा शिल्लक - कोयना धरण पाणी वाटप करार शेवट दिवस

कृष्णा पाणी वाटप लवादानुसार आरक्षित पाणी कोट्यापेक्षाही यंदा वीजनिर्मितीसाठी अतिरिक्त १५ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. आज (मंगळवार, दि. ३१) कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तरी देखील कोयना धरणात महिनाभर पुरेल इतका म्हणजे २० टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

Koyna Dam
कोयना धरण
author img

By

Published : May 31, 2022, 4:37 PM IST

कराड (सातारा) - कृष्णा पाणी वाटप लवादानुसार आरक्षित पाणी कोट्यापेक्षाही यंदा वीजनिर्मितीसाठी अतिरिक्त १५ टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. आज (मंगळवार, दि. ३१) कोयना धरणाच्या तांत्रिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. तरी देखील कोयना धरणात महिनाभर पुरेल इतका म्हणजे २० टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

तांत्रिक वर्षात अखंडीत वीजनिर्मिती - कोयना धरण हे संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यासाठी वरदायिनी मानले जाते. संपुर्ण तांत्रिक वर्षात कोयना धरणातून अखंडित वीजनिर्मिती झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र भारनियमनमुक्त राहिला. धरणातील सध्याच्या उपलब्ध पाणीसाठ्यामुळे जून अखेर पर्यंत जरी पाऊस झाला नाही तरी वीजनिर्मिती आणि सिंचनाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास धरण व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

गणपती आगमनादिवशी पाणीसाठ्याने गाठली होती शंभरी - गतवर्षी जून आणि जुलै महिन्यात कोयना पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या पंधरा दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्याने तब्बल ऐंशी टीएमसीचा टप्पा ओलांडत गणपती आगमनादिवशी शंभरी गाठली होती. कोयना धरणातील पाण्यावर वीज, सिंचन आणि पिण्याचे पाणी, या गरजा भागविल्या जातात. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असते.

कोयनेच्या पाण्यावर होते २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती - कोयना धरणातील ६७.२५ टीएमसी पाण्याचा वापर करून सुमारे २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते, तर ३० टीएमसी पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. यंदा वीजनिर्मितीसाठी अतिरिक्त १५ टीएमसी जादा पाणी वापरायला शासनाने परवानगी दिली. त्यामुळे अखंडीत वीजनिर्मिती करता आली. कृष्णा पाणीवाटप करारानुसार आज (मंगळवार दि. ३१ मे) तांत्रिक वर्ष समाप्त होत आहे. तरीही ३० मे अखेर धरणात २२.७७ टीएमसी इतका पुरेसा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे.

जलविद्युत प्रकल्पातून ३८०७.४०४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती - कोयना धरणातून चालू तांत्रिक वर्षात दिनांक ३० मे अखेर ३८०७.४०४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. पोपळी वीजगृहातून १३०६.८१५ दशलक्ष युनिट, चौथ्या टप्प्यातून १६६७.४५६ दशलक्ष युनिट पायथा वीजगृहातून १२८.७६७ दशलक्ष युनिट आणि अलोरे वीजगृहातून ७०४.३६६ दशलक्ष युनिट इतकी वीजनिर्मिती झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.