सातारा- दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या खंडाळा तालुक्यातील पळशी येथील तत्कालीन तलाठ्याला तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विजय व्यंकटराव भोसले असे शिक्षा झालेल्या तलाठ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार विषेश न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी हा निर्णय दिला आहे. तीन वर्ष सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
हे ही वाचा - परभणीत 10 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी उपसरपंचास अटक
याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील पळशी गावच्या हद्दीतील शेतजमीनीवरील बँक बोजा कमी करून त्याचा सातबारा उतारा देण्यासाठी 16 एप्रिल 2014 रोजी आरोपी तलाठी याने तक्रारदराला दोन हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार तत्कालीन पोलीस उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांनी 19 एप्रिल 2014 मध्ये सापळा रचून तलाठी भोसलेला दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कोरवाई केली होती.
भोसले याच्याविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याचा तपास श्रीहरी पाटील यांनी केला होता. पाटील यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर हा खटाला जलदगती न्यायालयात चालवण्यास सुरूवात झाली.
हे ही वाचा - नाशकातील लाचप्रकरणी अभियंता सतिश चिखलीकरसह सहकाऱ्याची निर्दोष मुक्तता
या प्रकरणी चार साक्षीदार तपासल्यानंतर सरकारी वकील लक्ष्मणराव खाडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून विषेश न्यायाधीश एन. एल. मोरे यांनी आरोपीला 3 वर्षे सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.
हे ही वाचा -नाशिक एपीएमसीचे सभापती शिवाजी चुंभळेंना तीन लाखांची लाच घेताना अटक