ETV Bharat / state

Boy Killed in Dog Attack : कराडमधील तीन वर्षांच्या चिमुरड्याचा श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू - Karad Latest News

कराड तालुकात वस्तीवर राहणऱ्या राजवीरची आई शेतात काम करत होती. त्यावेळी राजवीर हा घरापासून काही अंतरावर खेळत होता. यावेळी बारा ते पंधरा मोकाट श्वानांनी राजवीरवर हल्ला चढवला. त्याला फरपटत शेतात नेले. मोकाट श्वानांनी त्याचे लचके तोडले. क्रूरपणे श्वानांनी हल्ला करून राजवीरचा बळी घेतला.

Boy Killed in Dog Attack
कराडमधील तीन वर्षांच्या चिमुरड्याचा श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू
author img

By

Published : Jun 27, 2022, 10:32 PM IST

सातारा - मोकाट श्वानांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. राजवीर राहूल होवाळ, (रा. जगताप वस्ती, वाखाणभाग कराड), असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेने कराडकर हादरून गेले आहेत. नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ( Little Boy Killed in Dog Attack )

कराडमधील तीन वर्षांच्या चिमुरड्याचा श्वानांच्या हल्ल्यात मृत्यू

भटक्या श्वानांच्या कळपाचा हल्ला - मृत मुलाचे कुटूंंबीय जगताप वस्ती नावाच्या परिसरात राहते. सोमवारी दुपारी राजवीर याची आई शेतात काम करत होती. त्यावेळी राजवीर हा घरापासून काही अंतरावर खेळत होता. यावेळी बारा ते पंधरा मोकाट कुुत्र्यांनी राजवीरवर हल्ला चढवला. त्याला फरपटत शेतात नेले. मोकाट कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले. क्रूरपणे कुत्र्यांनी हल्ला करून राजवीरचा बळी घेतला.

शोध घेतल्यानंतर घटना उघडकीस - आई शेतात काम करत असताना राजवीर घराच्या परिसरात खेळत होता. मात्र, घरी आल्यानंतर आईला राजवीर दिसला नाही. त्यामुळे शोधाशोध सुरू झाली. घराजवळच्या शेतात राजवीरचा मृतदेह आढळला. त्याच्या शरीराचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडले होते. त्या विचित्र अवस्थेतील मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि नगरपालिका प्रशासन घटनास्थळी धावले.

हेही वाचा - Shambhuraj Desai on CM : अडीच वर्षे केवळ नावालाच राज्यमंत्री - शंभूराज देसाई यांचे गंभीर आरोप

हेही वाचा - Sangli suicide case : सांगलीतील 9 जणांची आत्महत्या नव्हे हत्याकांड; दोन मांत्रिकांनी दिलं जेवणातून विष

हेही वाचा - Maharashtra Politics Crisis : 'ही दोस्ती तुटायची नाय'; मित्रप्रेमासाठी दादा भुसे एकनाथ शिंदे गटात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.