ETV Bharat / state

चोरांची हुशारीः साताऱ्यात पीपीई किट घालून ज्वेलरीशॉपमध्ये चोरी, बघा व्हिडिओ - jwellery shop faltan robbery news

फलटण शहरातील रविवार पेठेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून हा परिसर कंटेन्मेंट झोन आहे. त्याला लागून असलेल्या रविवार पेठेत हिराचंद कांतीलाल सराफ हे सोने-चांदीचे दुकान आहे. मुख्य बाजारपेठेतील या दुकानावरच चोरट्यांनी संधी साधली आहे.

thief wear ppe kit and theft 1 kg gold
साताऱ्यात चोरट्याने पीपीई किट घालून तब्बल पाऊण किलो सोन्यावर मारला डल्ला
author img

By

Published : Jul 7, 2020, 6:27 AM IST

Updated : Jul 7, 2020, 11:56 AM IST

सातारा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चोरटेही जागरुक झाले आहेत. साताऱ्यातील फलटणमधील मध्यवस्तीत रविवार पेठेत चक्क पीपीई किटसदृश पोशाख घालून तब्बल पाऊण किलो सोन्यावर डल्ला मारला. मायक्रो कंटेन्मेंट झोनलगत असलेल्या भागात ही घटना घडली असून सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत.

साताऱ्यात पीपीई किट घालून ज्वेलरी शॉपमध्ये चोरी, पाऊण किलो सोने लंपास

सराफी दुकानाच्या भिंतीला छिद्र पाडून चोरट्यांनी 20 लाख रुपये किमतीचे 78 तोळे सोने लांबवले. या घटनेने खळबळ उडाली आहे. फलटण शहरातील रविवार पेठेत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून हा परिसर कंटेन्मेंट झोन आहे. त्याला लागून असलेल्या रविवार पेठेत हिराचंद कांतीलाल सराफ हे सोने-चांदीचे दुकान आहे. मुख्य बाजारपेठेतील या दुकानावरच चोरट्यांनी संधी साधली आहे. या चोरीमुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

Last Updated : Jul 7, 2020, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.