ETV Bharat / state

Vijay Diwas 2021 : हा संपूर्ण देशाचा 'विजय' होता, १६ डिसेंबर १९७१ आठवणी जागवल्या; पहा ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट

author img

By

Published : Dec 16, 2021, 1:24 PM IST

पाकिस्तानी सेनेच्या ९३ हजार सैनिकांनी १६ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय सेनेसमोर शरणागती पत्करली. भारत या युद्धात विजयी झाला. (1971 India-Pakistan War Day) भारतीय सेना, नौसेना, वायुसेनेच्या इतिहासात भारत-पाक युद्धात हा आपला सर्वात मोठा विजय होता. या विजयाने, भारताने बांगलादेशच्या (Indian and Bangladeshi Troops) निर्मितीत आपला ठसा उमटवला. हा विजय फक्त भारतीय सेना दलांचाच नव्हे तर, संपूर्ण देशाचा विजय होता. म्हणून हा दिवस दरवर्षी 'विजय दिवस' (Vijay Diwas 2021) साजरा केला जातो.

आज 16 डिसेंबर 1971 हा विजय दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. कोल्हापूरम्ये या कार्यक्रमावेळी जमलेले मान्यवर

सातारा - 1971 च्या युध्दात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानिमित्त 16 डिसेंबर हा विजय दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. (December 16 as Vijay Diwas to Commemorate Its Victory Over Pakistan During The 1971 War ) या बांगला मुक्ती लढ्यात खर्‍या अर्थाने हिरो ठरली होती पॅरा 2 बटालियन अर्थात छत्रीधारी सेना. पॅरा 2 बटालियनच्या सैनिकांनी पुंगली पुलावर कब्जा करत शत्रूची रसद रोखलीच. शिवाय भारतीय सैन्याला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळेच केवळ 13 दिवसात भारताला पाकिस्नावर विजय मिळविता आला. पॅरा 2 बटालियनने नेमकी काय कामगिरी केली होती, यासंदर्भातील 'ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट.

सातारा येथे आयोजीत कार्यक्रमात येथील निवृत्त सुभेदार मेजर आनंदराव चव्हाण यांनी विजयी दिवसाबद्दल काही आठवणी ईटीव्ही भारतशी बोलताना जागवल्या आहेत.
बांगला देशाच्या स्वातंत्र्यासाठी झाले होते युध्द

बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध हे बांगलादेशाला पाकिस्तानकडून स्वातंत्र्य मिळवण्यासाटी झालेले युद्ध होते. हे युद्ध 1971 साली झाले होते. पाकिस्तानी लष्कर आणि मुक्ती वाहिनी या संघटनेत हे युध्द झाले होते. (The 1971 India-Pakistan War Culminated On This Day 50 Years Ago) परंतु, 3 डिसेंबर 1971 रोजी भारतीय सैन्य मुक्ती वाहिनीच्या बाजूने युद्धात उतरले. त्यामुळे हे तिसरे युद्ध म्हणूनही ओळखले जाते. 16 डिसेंबर 1971 रोजी हे युद्ध संपले आणि बांगला देश स्वतंत्र झाला.

पॅरा 2 बटालियनची निर्णायक कामगिरी

पाकिस्तान आणि मुक्ती वाहिनी यांच्यात 1971 मधील मार्च महिन्यापासून युध्द सुरू होते. 3 डिसेंबर रोजी भारतीय सैन्य मुक्ती वाहिनीच्या बाजूने युध्दात उतरले. 11 डिसेंबर रोजी लेफ्टनंट जनरल के. एस. पन्नू यांच्या नेतृत्वाखाली पॅरा 2 बटालियनने एअर ड्रॉप केला. भारताच्या स्वातंत्र्यानंतरचा तो पहिला एअर ड्रॉप होता. पूर्व पाकिस्तानमधील तंगेल भागातील जमालपूर-तंगेल (Indian and Bangladeshi Troops) मार्गावर लोहागंज नदीवरील पुंगली पूल आणि तंगेलकडे जाणार्‍या नौकाघाट मार्गावर सैनिकांनी कब्जा मिळविला. ही जबाबदारी होती पॅरा 2 बटालियनवर. त्यामध्ये बटालियनने जिगरबाज आणि निर्णायक कामगिरी बजावल्याने भारतीय सैन्याला विजयाकडे कूच करता आली.

तंगेल मुख्यालयावरही मिळविला ताबा

तंगेलवर ताबा मिळविल्यानंतर तंगेलच्या मुख्यालयाचाही ताबा घेण्याचा आदेश भारतीय लष्कराच्या वरिष्ठांनी दिला. त्यानुसार पॅरा 2 बटालियनने आगेकूच करत जिल्हा मुख्यालय ताब्यात घेतले. नंतर सर्व सैन्याने ढाक्यापर्यंत मजल मारली. युध्दात आघाडीवर असलेल्या सैन्य दलाला (अग्रीम दल) सामील होत पॅरा 2 बटालियन मीरपूर, जमालपूरकडे आगेकूच करत ढाक्यापर्यंत पोहोचली.

अखेर तो दिवस उजाडला

16 डिसेंबर 1971 रोजी पहाटे मेजर जनरल नाग्रा यांचा संदेश घेऊन त्यांचे एडीसी आणि कॅप्टन शर्मा हे पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अब्दुल नियाजी यांच्या मुख्यालयात पोहोचले. 'अब्दुल्ला, मी इथे पोहोचलोय. खेळ संपला आहे. (Vijay Diwas Celebrated In Satara 2021) मी तुम्हाला शरणागतीचा पर्याय देतोय. तुमची देखभाल केली जाईल', असा संदेश नियाजींना देण्यात आला आणि पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली. सकाळी साडे दहा वाजता लेफ्टनंट जनरल के. एस. पन्नू यांच्या नेतृत्वाखालील पॅरा 2 बटालियनने ढाक्यात प्रवेश करत पाकिस्तानी सेनेची मुख्यालये ताब्यात घेतली. ढाक्याच्या इंटरकाँटिनेटल हॉटेलमध्ये आश्रय घेतलेल्या विदेशी नागरीकांनी तसेच छायाचित्रकारांनी भारतीय सेनेचे जंगी स्वागत केले. पॅरा 2 बटालियनची विभागणी करून सुरक्षेच्या कारणास्तव इंटरकाँटिनेटल हॉटेल, ढाका स्टेडियम आणि मोतीझील बाजार, अशा तीन ठिकाणी तैनात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते, अशा आठवणी निवृत्त सुभेदार मेजर तथा ऑनररी कॅप्टन आनंदराव चव्हाण यांनी सांगितल्या.

पॅरा 2 ने साजरा केला पुंगली डे

पाकिस्तान आणि मुक्ती वाहिनी गटातील युध्दात भारतीय सैन्याने 3 डिसेंबर रोजी भाग घेतला. त्यानंतर सातच दिवसात भारताच्या पॅरा 2 बटालियनने महत्वाच्या पुंगली पुलाचा कब्जा घेतला. विमानातून पॅराशूटद्वारे उड्या घेत हे ऑपरेशन यशस्वी केले होते. ज्यामुळे भारतीय सैन्याला ढाक्यापर्यंत मजल मारता आली. बांगला मुक्ती लढ्यात पुंगली ब्रीज या ऑपरेशनची ठळक नोंद घेतली गेली. म्हणून पॅरा 2 बटालियन प्रत्येक वर्षी 10 डिसेंबर हा पुंगली डे म्हणून साजरा करते. यंदा कराडमध्ये पुंगली डे साजरा करण्यात आला. यावेळी युध्दात प्रत्यक्ष सहभागी असणारे पॅरा 2 बटालियनमधील निवृत्त जवान उपस्थित होते. सैन्य दलात कार्यरत असणार्‍या आणि निवृत्त झालेल्या अधिकार्‍यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

सातार्‍यातील शंभर ते दीडशे जवान होते युध्दात

भारत-पाकिस्तान युध्दात सातारा जिल्ह्यातील शंभर ते दीडशे जवानांचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यातील आज हयात किती आहेत, याचा निश्चित आकडा समजू शकला नाही. मात्र, कराडमध्ये झालेल्या कार्यक्रमाला 13 निवृत्त जवान उपस्थित होते. दरवर्षी पॅरा 2 बटालियनतर्फे बांगला मुक्ती संग्रामातील जवानांसमवेत पुंगली डे साजरा केला जातो. यंदाचा 50 पुंगली डे साजरा करताना पॅरा 2 बटालियनमधील निवृत्त छत्रीधारी सैनिकांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी पॅरा 2 बटालियनमधील निवृत्त सुभेदार मेजर तथा ऑनररी कॅप्टन आनंदराव चव्हाण, सुभेदार मेजर संजय पोटे, कॅप्टन केशव भोसले, कॅप्टन संजय सावंत, हुद्देदार मेजर संपतराव घोरपडे, मेजर सुतार, हवालदार जगदाळे, संपत जाधव, ऑनररी कॅप्टन सरदार, आटलरीचे निवृत्त सैनिक आनंदा चव्हाण उपस्थित होते.

हेही वाचा - Indrani Mukherjee letter To CBI : शीना बोरा कश्मीरमध्ये जिवंत, इंद्राणी मुखर्जीचं सीबीआयला पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.