ETV Bharat / state

न्यायालयाने फेटाळले खंडणीबहाद्दर वन कर्मचाऱ्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज - satara latest news

शेतातील पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडाला हाकलण्यासाठी गेलेल्या तरुणाकडून खंडणी मागणाऱ्या वनपाल व वनरक्षकाचा जामीन फेटाळण्यात आले आहे.

सातारा न्यायालय
सातारा न्यायालय
author img

By

Published : Sep 22, 2020, 10:46 PM IST

सातारा - तरुणाकडून 25 हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला परळीचा वनपाल योगेश गावित व वनरक्षक महेश सोनावले यांचा अटकपूर्व जामीनअर्ज आज (दि. 22 सप्टें.) सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. बोरगाव पोलीस ठाण्यात वनविभागातील परळीचे वनपाल योगेश गावित व वनरक्षक महेश सोनावलेसह अन्य दोन वनरक्षकांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

ओंकार शिंदे (पिरेवाडी, भैरवगड, ता. सातारा) हा पिकांचे नुकसान करणाऱ्या माकडांना हाकलण्यासाठी शेतात गेला होता. तेथे वनपाल योगेश गावित, वनरक्षक महेश सोनावलेसह चौघांनी त्याला पकडले. गावितने कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुझ्यावर प्राण्यांची शिकार करण्याचा गुन्हा दाखल करतो, असे धमकावले होते. 25 हजार रुपयांची खंडणी घेतल्यानंतर ओंकारची सुटका करण्यात आली, असे ओंकार शिंदे याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

दि. 5 सप्टेंबरला बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून संशयित फरार आहेत. दरम्यान, गावित व सोनावले यांनी अटकपूर्व जामिनासाठी येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांच्यापुढे सुनावणी झाली.

राधानगरी अभयारण्यात कामाला असताना 2015मध्ये गावित याच्यावर याच पद्धतीचा 1 लाख रुपये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गावितला यापूर्वी सेवेतून निलंबितही करण्यात आले होते, असे सरकारपक्षातर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच खंडणीची रक्कम देण्यासाठी तक्रारदाराने लोकांकडून हातउसने घेतलेल्या लोकांचे जबाब व काॅल रेकाॅर्ड सादर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचा - कोरोना रुग्णांच्या वारेमाप बिलांना चाप... प्रशासनाने परत मिळवून दिली अधिकच्या बिलातील 34 लाखांची रक्कम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.