सातारा - पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गावर उंब्रज (ता. कराड) येथील तारळी नदीच्या पुलाचा कठडा तोडून ट्रॅव्हलर ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली. यामध्ये ट्रॅव्हलरमधील ५ जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभिर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गाडी पन्नास फूट खोल नदीपात्रात कोसळली
कराड येथील तारळी नदीच्या पुलाचा कठडा तोडून टेम्पो ट्रॅव्हलर ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली. त्यात ५ जण जागीच ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना आज (शनिवारी) पहाटे घडली. मृतांमध्ये तीन पुरुष एक महिला आणि तीन वर्षांच्या लहान मुलाचा समावेश आहे.
गोव्याकडे निघाले असता झाला अपघात
नवी मुंबईहून टेम्पो ट्रॅव्हलरने गोव्याकडे निघाले असता हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर जे किरकोळ जखमी होते ते रस्त्यावर आले. त्याच वेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या काहीजणांना त्यांनी अपघाताची माहिती दिली. त्यानंतर तातडीने जवळच्या उंब्रज पोलिसांना अपघाता बाबत कळविण्यात आले. पोलीस आल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू झाले. जखमींना अपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात-
पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झाले असून 13 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त रुग्णवाहिका मृतदेह घेऊन तेलंगाणा राज्यात जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सहा जण रुग्णवाहिकेतून पुण्याहून ते हैद्राबादला जात होते. आज पहाटे 3 वाजता भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाचा ताबा सुटला आणि समोर जाणाऱ्या ट्रकला धडकली. यामध्ये रवी माणिक राठोड (वय 38 वर्ष, रा माळवाडी, वारजे, पुणे), बुद्धीबाई चण्णा पाळत्या (वय 48 वर्ष, रा माळवाडी, वारजे, पुणे) आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.
हेही वाचा- पाक सीमेवर धुमश्चक्री: नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या भूषण यांना वीरमरण