ETV Bharat / state

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजकारणाचा यज्ञ तेवत ठेवणे गरजेचे - सुशिलकुमार शिंदे

साळुंखे तात्या समाजवादी विचारसरणीचे पक्के विचारवंत होते. डॉ. लोहिया, ना.ग. गोरे, ग. प्र. प्रधान, एस .एम. जोशी, साने गुरुजी यांच्या मुशीत त्यांचे नेतृत्व तयार झाले होते. ज्या विचारातून माणूस उभा राहतो, त्याला फार महत्त्व आहे. विविध समाजातील लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व दिले, देश उभा केला पण त्यांना काय मिळाले? असा सवालही शिंदे यांनी यावेळी केला.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमात बोलताना
author img

By

Published : Nov 20, 2019, 7:14 PM IST

सातारा - जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या निवडणुका यापूर्वी झाल्या नाहीत. मात्र, आता जाती-धर्माच्या नावावर निवडणुका होऊ लागल्या आहेत. समाजभूषण हणमंतराव साळुंखे यांनी समाजवादी समाजरचनेचा विचार घेऊन जाती-धर्माच्या पलीकडे समाजकारण आणि राजकारण करण्याचा विचार मांडला. त्यांच्या या विचारांचा यज्ञ तेवत ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. खटाव येथील समाज भूषण हणमंतराव साळुंखे यांच्या ग्रंथप्रकाशन व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा -'डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होईल'

शिंदे मार्गदर्शनावेळी पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, महाराष्ट्राच्या सारस्वताला विद्या प्रदान करणारे डॉ. शिवाजीराव भोसले व दबलेल्या लोकांच्या जीवनाला उर्जितावस्था देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे हणमंतराव साळुंखे तात्या यासारख्या विद्वानांचे कलेढोण हे गाव आहे. साळुंखे तात्या समाजवादी विचारसरणीचे पक्के विचारवंत होते. डॉ. लोहिया, ना.ग. गोरे, ग. प्र. प्रधान, एस .एम. जोशी, साने गुरुजी यांच्या मुशीत त्यांचे नेतृत्व तयार झाले होते. ज्या विचारातून माणूस उभा राहतो, त्याला फार महत्त्व आहे. विविध समाजातील लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व दिले, देश उभा केला पण त्यांना काय मिळाले? असा सवालही शिंदे यांनी यावेळी केला.

70 वर्षे विकास झाला नाही असे म्हणणारे आणि या काळात भव्य कामेही झाली असे म्हणणाऱयांचा मला इतिहास आठवतो. माणसे 5 ते 10 वर्षे चालवून घेतात. मात्र, इतिहासाचे ठसे तसेच असतात ते कधीही पुसले जात नाहीत. हणमंतराव साळुंखे इतिहासाचे सामाजिक चळवळीचा इतिहास ठेवणारे व्यक्तिमत्व होते. त्यांनी दबलेल्या नाभिक समाजाचा स्वाभिमानाने उभे करण्यासाठी आयुष्यभर त्यांनी शिवधनुष्य पेलले, असे म्हणत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर आपल्या भाषणात टीका केली.

आयोजित समारंभाला आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रताप शेठ साळुंखे, मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, अनिल देसाई, जिल्हा परिषदच्या समाज कल्याण समितीचे सभापती शिवाजी सर्वगोड आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन डॉ. एस. एन. पवार यांनी केले तर आभार संजीव साळुंखे यांनी मानले.

हेही वाचा -मोदी-पवार बैठक पूर्ण, ४५ मिनिटे सुरू होती चर्चा..

Intro:सातारा- यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून राजकीय निवडणुका झाल्या नाहीत. मात्र आता जाती-धर्माच्या नावावर निवडणुका होऊ लागल्या आहेत. समाजभूषण हणमंतराव साळुंखे यांनी समाजवादी समाजरचनेचा विचार घेऊन सगळा समाज एकत्र व्हावा व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समाजकारण व राजकारण करावे यासाठी त्यांनी मांडलेला यज्ञ तेवत ठेवणे हे सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

Body:खटाव येथील समाज भूषण हणमंतराव साळुंखे यांच्या ग्रंथप्रकाशन व पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. सदर वेळी आ. जयकुमार गोरे ,माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रताप शेठ साळुंखे, मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, अनिल देसाई, जि.प.च्या समाज कल्याण समितीचे सभापती शिवाजी सर्वगोड नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुशीलकुमार शिंदे मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले, माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले, महाराष्ट्राच्या सारस्वताला विद्या प्रदान करणारे डॉ.शिवाजीराव भोसले व दबलेल्या लोकांच्या जीवनाला उर्जितावस्था देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे हणमंतराव साळुंखे तात्या यासारख्या विद्वानांचे कलेढोण हे गाव आहे. साळुंखे तात्या समाजवादी विचारसरणीचे पक्के विचारवंत होते. डॉ. लोहिया ,ना.ग गोरे, ग. प्र. प्रधान, एस .एम. जोशी, साने गुरुजी यांच्या मुशीत त्यांचे नेतृत्व तयार झाले होते. ज्या विचारातून माणूस उभा राहतो त्याला फार महत्त्व आहे. विविध समाजातील लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व दिले ,देश उभा केला पण त्यांना काय मिळाले? ७० वर्षे काही झाली नाही म्हणणारे यांचा व सत्तर वर्षात भव्य कामे झाली असे म्हणणारे यांचा इतिहास आठवतो. माणसे पाच-दहा वर्षे चालवून घेतात मात्र इतिहासाचे ठसे ठेवलेले असतात ते कधीही पुसले जात नाहीत. हणमंतराव साळुंखे इतिहासाचे सामाजिक चळवळीचा इतिहास ठेवणारे व्यक्तिमत्व होते . त्यांनी दबलेल्या नाभिक समाजाचा स्वाभिमानाने उभे करण्यासाठी आयुष्यभर धनुष्यबान उचलले.

सदर वेळी सुरेंद्र गुदगे, प्रभाकर घार्गे ,गोपीचंद पडळकर, समृद्धी जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन डॉ. एस. एन. पवार यांनी केले तर आभार संजीव साळुंखे यांनी मानले.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.