सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जमावबंदी करण्यात आली आहे. म्हसवड, वडूज दहिवडी या शहरांमध्ये उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी पाहणी केली. नागरिक रस्त्यावरती फिरल्यास कडक कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचा इशाराही जिरंगे यांनी दिला.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन देश 21 दिवसांसाठी 'लॉकडाऊन' केला आहे. हा लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माण-खटाव तालुक्यातही महत्त्वाच्या ठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. तरी देखील काही नागरिक बाहेर फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांना महसूल प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने चोप देण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - कोरोनाविरोधात तीन वर्षाच्या चिमुकलीचा लढा यशस्वी
माण-खटाव तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. शहरांमध्ये प्रत्येक चौकात पोलिसांचा खडा पहारा असून काही ठिकाणी कारवाई देखील करण्यात येत आहे.