ETV Bharat / state

Student Bike Accident: निरोप समारंभाच्या आधीच विद्यार्थ्याच्या दुचाकीचा अपघात; दहावीचा विद्यार्थी ठार - विद्यार्थ्याचा मृत्यू

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मरळी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील एका शाळेत दहावीच्या निरोप समारंभाच्या काही तास आधी दुचाकीचा अपघातात झाला. यात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. प्रतीक रमेश पाटील (रा. मरळी, ता. पाटण), असे मृत मुलाचे नाव आहे. अपघातात आणखी दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Student Bike Accident
विद्यार्थ्याच्या दुचाकीचा अपघात
author img

By

Published : Feb 25, 2023, 10:59 PM IST

सातारा: दहावीच्या निरोप समारंभाच्या काही तास आधी दुचाकी अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दोन जण जखमी झाले. प्रतीक रमेश पाटील (रा. मरळी, ता. पाटण) असे मृत मुलाचे नाव आहे. अपघातातील प्रतीक आणि त्याचे दोन मित्र एका दुचाकीवरून फिरत होते. त्यावेळी टाटा सुमो गाडीला त्यांच्या दुचाकीने समोरून धडक दिली.

दुचाकीची टाटा सुमोला धडक: मल्हारपेठ पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार मरळी (ता. पाटण) येथील वत्सलादेवी विद्यालयात शनिवारी इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ होता. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी दहावीच्या वर्गातील प्रतीक पाटील, हर्षद पाटील आणि सुमित टोपले हे विद्यार्थी मोटरसायकलवरून फिरत होते. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते तिघे एकाच मोटरसायकलवरून मरळीहून देसाई कारखान्याच्या दिशेने जात असताना गणेश मंदिरा समोरील उताराला त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकीने टाटा सुमो गाडीला जोराची धडक बसली.

एक जण जागीच ठार: या भीषण अपघातात दुचाकी चालविणारा प्रतीक पाटील हा जागीच ठार झाला. तर हर्षद पाटील आणि सुमित टोपले हे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्याचा निरोप समारंभदिनी अपघाती मृत्यू झाल्याने विद्यालयावर शोककळा पसरली. दहावीच्या परीक्षेपूर्वीच प्रतिकचा झालेला अपघाती मृत्यू मरळी परिसराला चटका लावून गेला. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एच. जगदाळे, पी. व्ही. पाटील हे तपास करत आहेत.

स्कूल व्हॅनने घेतला पेट : शाळकरी मुलांना घेऊन निघालेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथे घडली. या घटनेत संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली. चालकाच्या समय सूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

दहा विद्यार्थी सुदैवाने बचावले: स्कूल व्हॅनमध्ये शेडगेवाडी येथील आठ ते दहा विद्यार्थी होते. ही स्कूल व्हॅन गॅसवर चालवली जात होती. तसेच वाठार कॉलनी येथील हायस्कूलचाच शिपाई हा व्हॅन चालवत होता, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. व्हॅनने अचानक पेट घेतल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढल्याने विद्यार्थी सुदैवाने बचावले.

हेही वाचा: Kasba By Election 2023 : कसबा पोटनिवडणूक; मतदारसंघाचा असा आहे इतिहास...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.