ETV Bharat / state

साताऱ्यातील तारळेमध्ये जिलेटिनचा साठा जप्त - जिलेटिनच्या कांड्या

जिल्ह्यात स्फोटक पदार्थांच्या बेकायदेशीर साठ्यांवर आणि वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्हा विशेष शाखेला दिले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सातारा दहशतवादविरोधी पथकाने तारळे (ता. पाटण) येथे छापा मारला.

जिलेटिन
जिलेटिन
author img

By

Published : May 13, 2021, 3:18 PM IST

कराड (सातारा) - नागरी वस्तीत तसेच चारचाकी वाहनात ठेवलेल्या जिलेटिन स्फोटकाचा मोठा साठा सातारा दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला आहे. पाटण तालुक्यातील तारळे गावात ही कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी 103 किलो वजनाच्या जिलेटिनच्या 836 कांड्या आणि बोलेरो गाडी, असा 3 लाख 9 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गोविंदसिंग बाळूसिंग राजपूत-यादव याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे छापा

जिल्ह्यात स्फोटक पदार्थांच्या बेकायदेशीर साठ्यांवर आणि वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी जिल्हा विशेष शाखेला दिले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सातारा दहशतवादविरोधी पथकाने तारळे (ता. पाटण) येथे छापा मारला. संशयीत गोविंदसिंग बाळूसिंग राजपूत-यादव याच्या घराची तसेच आसपासच्या परिसराची झडती घेतली असता घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शौचालयात चार बॉक्समध्ये जिलेटिनच्या कांड्या (स्फोटक पदार्थ) आढळून आल्या. तसेच घरासमोर उभ्या केलेल्या पांढर्‍या रंगाच्या बोलेरो गाडीच्या पाठीमागील बाजूस सीटच्या खाली निळ्या रंगाच्या पिशवीत जिलेटिनच्या 29 कांड्या तर दुसर्‍या पिशवीत वायरसह 27 डिटोनेटर्स आढळले.

गुन्हा नोंद

याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस नाईक सागर भोसले यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात संशयीताविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिलेटिनच्या 836 कांड्या आणि बोलेरो असा 3 लाख 9 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवादविरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, पोलीस नाईक सागर भोसले, कॉन्स्टेबल सुमित मोरे, अनिकेत अहिवळे, केतन जाधव, नीलेश बच्छाव यांनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.