ETV Bharat / state

कराड-सोलापूर मार्ग पाण्याखाली; एसटी सेवा ठप्प

author img

By

Published : Oct 15, 2020, 10:48 PM IST

पावसामुळे विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक दुपारनंतर बंद करण्यात आली असून स्थानिक वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच महामार्गा नजिकच्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून छोट्या-मोठ्या दुकानांतही पाणी शिरले आहे.

कराड
कराड

कराड (सातारा) - पावसामुळे विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक दुपारनंतर बंद करण्यात आली असून स्थानिक वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच महामार्गानजीकच्या शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून छोट्या-मोठ्या दुकानांतही पाणी शिरले आहे. दुकानांमध्ये शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

कराड-सोलापूर मार्ग पाण्याखाली

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कराडनजीकच्या सैदापूर कॅनाल परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून शेतातील पाणी रस्त्यावर आल्याने विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्ग पाण्यात गेला आहे. रस्त्यावर साडे तीन फुटांपेक्षा अधिक पाणी असल्याने सर्व आगारांनी कराड-सोलापूर मार्गावरील एसटी फेर्‍या रद्द केल्या आहेत. स्थानिक वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गाने वळविली आहे. तसेच सैदापूर कॅनाल आणि ओगलेवाडी रेल्वे स्टेशन बाजूने रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांनी बॅरिकेटस् लावून त्याठिकाणी पोलीस तैनात केले आहेत.

हेही वाचा - ...तर पालकमंत्र्यांचा सत्कार भाजपच करेल, आमदार संभाजी पाटील-निलंगेकरांचे आव्हान

हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच रस्त्यावर पाणी आल्यामुळे एसटी आगारांनी सोलापूर मार्गावरील गाड्या रद्द केल्या आहेत. पावसामुळे पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गाचे उप रस्तेही (सब वे) पाण्याखाली गेले आहेत. महामार्गाच्या भुयारी मार्गातही पाणी भरले आहे. कराडनजीकच्या गोटे गावच्या हद्दीतील सब वे वर उभी केलेली कार पावसाच्या पाण्यात पुर्णपणे बुडाली आहे.

कराड-ओगलेवाडी या दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे कराड-सोलापूर दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. तसेच ओगलेवाडी मार्गावरील गजानन हौसिंग सोसायटीतील घरांमध्ये पाणी शिरले आहे. सर्व रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनधारकांची कोंडी झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.