ETV Bharat / state

ST driver Heart attack: एसटी वाहकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू - कर्मचारी

मंडणगडहून मिरजकडे निघालेल्या एसटीच्या कंडक्टरचा चालत्या गाडीत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाटण (Patan) तालुक्यातील नवारस्ता गावच्या हद्दीत ही घटना घडली. वाल्मिक शंकर कोळी (वय - 42), असे कंडक्टरचे नाव आहे.

ST driver Heart attack
Satara News
author img

By

Published : Jun 25, 2022, 5:04 PM IST

Updated : Jun 26, 2022, 8:33 AM IST

सातारा : मंडणगडहून मिरजकडे निघालेल्या एसटीच्या कंडक्टरचा चालत्या गाडीत ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पाटण (Patan) तालुक्यातील नवारस्ता गावच्या हद्दीत ही घटना घडली. वाल्मिक शंकर कोळी (वय - 42), असे कंडक्टरचे नाव आहे. एसटी चालक आणि प्रवाशांनी (passengers) त्याला नवारस्त्यावरील विघ्नहर्ता क्लिनिकमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे एसटीतील प्रवाशांना आपले अश्रू अनावर झाले.

पाच वर्षापुर्वी एसटीत झाला होता भरती
वाल्मिक कोळी हे पोतले (ता. कराड) गावचे रहिवासी होते. 5 वर्षापुर्वी एसटी महामंडळात वाहक म्हणून भरती झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri district) मंडणगड आगारात ते कार्यरत होते. सकाळी 9 वाजता मंडणगड- मिरज गाडी घेऊन ते निघाले होते. एसटी पाटण तालुक्यातील नवारस्ता गावच्या परिसरात आली असताना वाल्मिक कोळी यांच्या छातीत दुखू लागले. एसटी चालकाने तातडीने गाडी थांबवून त्यांना नवारस्ता येथील विघनहर्ता क्लिनिकमध्ये घेऊन जात होते. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

प्रवाशांना अश्रू अनावर
मंडणगड-मिरज (Mandangad-Miraj) एसटी पाटणमध्ये आल्यानंतर प्रवाशांच्या जेवणासाठी काही वेळ थांबली होती. त्यावेळी प्रवाशी आणि चालक- वाहक प्रवाशांशी गप्पा मारत जेवले. पाटणमधून एसटी निघाल्यानंतर काही वेळात वाल्मिक कोळी यांना चालत्या गाडीत ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रवाशांना देखील जबर धक्का बसला. तीन- चार तासाच्या प्रवासातील कंडक्टर कोळी यांच्या मनमिळाऊ स्वभावाच्या आठवणी दाटून आल्याने एसटीतील प्रवाशांना आपले अश्रू अनावर झाले. सर्व प्रवाशी नवारस्ता येथे दोन-तीन तास थांबून होते. नंतर चालकाने त्यांची दुसर्‍या गाडीने जाण्याची व्यवस्था केली.

कुटुंबाचा आधार तुटला
वाल्मिक कोळी हे पत्नी आणि दोन मुलांसमवेत पोतले गावी राहत होते. ते घरातील एकमेव कर्ता पुरूष होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आधारच तुटला. कोळी यांच्या मृत्यूनंतर पाटण एसटी आगारातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मल्हारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद झाल्यानंतर पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

हेही पाहा- Rebel Threats Shakhapramukh : बंडखोर शिवसेना आमदारांकडून शाखाप्रमुखांना धमकी

Last Updated : Jun 26, 2022, 8:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.