ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात चारा छावण्यांवर राहणार भरारी पथकाची नजर

पावसाळ्यात दुष्काळी माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यात पाऊस झाला नाही. परिणामी चारा उत्पादन घटले गेले. त्यामुळे या भागात छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

सातारा चारा छावण्या
author img

By

Published : May 5, 2019, 3:37 PM IST

सातारा - जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होवून ७ ते ८ महिने झाले. मात्र, प्रशासनाने चारा छावण्या सुरू करण्यासाठी एप्रिल महिना लावला. यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी होती. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी माण तालुक्यात २० चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी १८ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. चारा छावणीमध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पथके तयार केली आहेत.

चारा छावणी

जिल्हा, तालुकास्तरीय अशी ५ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांचा छावण्यावरती पहारा असणार आहे. जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर बनली आहे. पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आम्हाला पाणी मिळत नाही तर जनावरांना कुठून मिळणार असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांना पाणी पिण्यासाठी नाही. मग जनावरांना शासन पाणी पुरवठा कसा करते..? असा देखील प्रश्न उपस्थित राहत आहे.

शासनाकडून शेळ्या मेंढ्यांसाठी प्रतिदिन ४ लिटर तर लहान जनावरांसाठी प्रति दिन १५ लिटर व मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन ३५ ते ४० लिटर पाणी प्रशासनाकडून टँकरने दिले जात असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र स्थानिक पातळीवर फक्त कागदोपत्रीच जनावरांचे टँकर दिसून येत असल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यात दुष्काळी माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यात पाऊस झाला नाही. परिणामी चारा उत्पादन घटले गेले. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. या भागात चारा छावण्या सुरू करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नव्हता. त्यामुळे या भागात छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

२०१२ मध्ये मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू होत्या. त्यावेळी अनेक चारा छावणी चालकांनी भ्रष्टाचार केल्याचे समोर आले होते. यावेळी असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी चाराछावण्या तपासणी पथके तयार केली आहेत. चारा छावणी चालक नियमांचे पालन करतात का. नोंदवह्या विविध तांत्रिक आर्थिक बाबींची तपासणी हे पथक पंधरा दिवसांनी एकदा करणार आहे.

तपासणी पथक

तपासणी पथकात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, कृषी विकास अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच तालुका तपासणी पथकात गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी कृषी अधिकारी संबंधित ग्रामसेवक यांचा समावेश करण्यात आला आहे.

Intro:सातारा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर होऊन सात ते आठ महिने झाले मात्र प्रशासनाने चारा छावण्या सुरु करण्यासाठी एप्रिल महिना उलटवला आहे. यामुळे शेतकरी वर्गात मोठी नाराजी होती. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी माण तालुक्यात 20 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली त्यामधील 18 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या चारा छावणी मध्ये गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पथके तयार केली आहेत. जिल्हा, तालुकास्तरीय अशी पाच पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांचा छावण्यावरती वॉच असणार आहे.

Body:जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर बनली आहे. पशुधनाला पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र शेतकरी आम्हला पाणी मिळत नाही तर जनावरांना कुठून मिळणार असे बोलत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी पिण्यासाठी नाही. मग जनावरांना शासन पाणी पुरवठा कसा करत..? असा देखील प्रश्न उपस्थित राहत आहे. पंधरा ते वीस दिवसांनी टॅंकर येत असल्याचा आरोपी नागरिक करत आहेत.

शासनाकडून शेळ्या मेंढ्यांसाठी प्रतिदिन 4 लिटर तर लहान जनावरांसाठी प्रति दिन 15 लिटर व मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन 35 ते 40 लिटर पाणी प्रशासनाकडून टँकरने दिले जात असल्याची माहिती दिली जात आहे. मात्र स्थानिक पातळीवर फक्त कागदोपत्रीच जनावरांचे टॅंकर दिसून येत असल्याचे समोर आले आहे. पावसाळ्यात दुष्काळी माण, खटाव, कोरेगाव, फलटण तालुक्यात पाऊस झाला नाही. परिणामी चारा उत्पादन घटले गेले. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. या भागात चारा छावण्या सुरू करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नव्हता. त्यामुळे या भागात छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यावरती प्रशासनाने लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक चारा छावणी चालकाला छावण्यां वरती सीसीटीव्ही व रजिस्टर करण्यासाठी बंधनकारक केले आहे.

2012 मध्ये मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू होत्या त्यावेळी अनेक चारा छावण्या चालकांनी भ्रष्टाचार केल्याचे समोर आले होते. त्यावेळी असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने वेळीच दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी चाराछावण्या तपासणी पथके तयार केली आहेत. चारा छावणी चालक नियमांचे पालन करतात का. नोंदवह्या विविध तांत्रिक आर्थिक बाबींची तपासणी हे पथक पंधरा दिवसांनी एकदा करणार आहे.

तपासणी पथक...
तपासणी पथकात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, कृषी विकास अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच तालुका तपासणी पथकात गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पशुधन विकास अधिकारी कृषी अधिकारी संबंधित ग्रामसेवक यांचा समावेश करण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.