सातारा - विधवा प्रथा बंदीच्या निर्णयासोबतच सोनगाव ग्रामपंचायतीने महिला सन्मान समिती स्थापन केली आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून हा निर्णय झाला आहे. या समितीमध्ये गावातील 10 महिलांचा समावेश करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील सोनगावच्या या निर्णयाला ग्रामपंचायतींकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
जकातवाडी, हेरवाडच्या निर्णयाचे राज्यभर अनुकरण - सातार्यातील जकातवाडी ग्रामपंचायतीने सर्वप्रथम विधवा प्रथा बंद केली होती. मात्र, त्याची फारशी प्रसिध्दी झाली नव्हती. तथापि, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची राज्यभर चर्चा झाली. ग्रामपंचायत स्तरावर या निर्णयाला मोठा प्रतिसाद मिळाला. हेरवाड पाठोपाठ अनेक ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा रद्द करण्याचे ठराव मंजूर केले. या निर्णयाने करत या महिलांना समाजात मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. सातारा जिल्ह्यातील सोनगाव तर्फ सातारा ग्रामपंचयातीने देखील विधवा प्रथा बंदीचा ठराव घेतला. महिलांना समान्माची वागणूक मिळावी म्हणून महिला सन्मान समिती स्थापन करण्यात आली. विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचा निर्णयही घेतला आहे.
अंमलबजावणी करणार - ठराव मंजूर झाल्यावर त्याची अंमलबजावणी होते की नाही याचीही पाहणी केली जाणार आहे. महिला सन्मान समिती गावातील सुख-दुःखाच्या प्रसंगी यासंदर्भात पाहणी करणार आहे. या समितीचे अध्यक्षपद कल्पना नावडकर यांना देण्यात आले आहे.
माजी सैनिकाकडून विधवांच्या पुनर्विवाहासाठी 1 लाखाची मदत - विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाला माजी सैनिक गोविंदराव आनंदराव नावडकर यांनी सक्रीय पाठिंबा दिला आहे. गावातील 10 विधवांच्या पुनर्विवाहासाठी एक लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. प्रत्येक लग्नासाठी दहा हजार रुपये मदत ते देणार आहेत. या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे.
हेही वाचा - Maharashtra HSC 2022 Result : आज बारावीचा ऑनलाइन निकाल, 'इथे' पाहा तुमचे गुणपत्रक