ETV Bharat / state

आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबाला टाकले वाळीत; अंनिस आणि पोलिसांच्या मध्यस्थीने कुटुंबाला न्याय - family condemn due to intercaste marriage

मेढा येथील रहिवासी कुटुंबातील मुलीचा आंतरजातीय विवाह तिच्या पसंतीने, तसेच संबंधित समाजातील लोकांना कल्पना देऊन झाला. विवाहाला सर्वांना निमंत्रितही करण्यात आले. तरीही मुलीच्याच समाजातील जात पंचायतीने मुलीच्या कुटुंबीयांना बहिष्कृत केले होते.

society condemn to family over intercaste marriage satara
अंनिस आणि पोलिसांच्या मध्यस्थीने कुटुंबाला न्याय
author img

By

Published : Aug 27, 2021, 7:04 AM IST

Updated : Aug 27, 2021, 7:33 AM IST

सातारा - मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरुन जात पंचायतीने जावळी तालुक्यातील मेढा येथील संपुर्ण कुटुंबाला बहिष्कृत केले होते. याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलिसांच्या मदतीने यशस्वी मध्यस्थी केली. यामुळे पंचायतीने निर्णय मागे घेत वेगळा आदर्श घालून दिला.

याबाबतची प्रतिक्रिया

तीन जिल्ह्यातील बसली जात पंचायत -

मेढा येथील रहिवासी कुटुंबातील मुलीचा आंतरजातीय विवाह तिच्या पसंतीने, तसेच संबंधित समाजातील लोकांना कल्पना देऊन झाला. विवाहाला सर्वांना निमंत्रितही करण्यात आले. तरीही मुलीच्याच समाजातील जात पंचायतीने मुलीच्या कुटुंबीयांना बहिष्कृत केले होते. समाजातील अनेक कार्यक्रमांना बोलावले जात नव्हते. या बहिष्कार प्रकरणात पोलादपूर (जि.रायगड), नागेवाडी (ता.सातारा), मेढा (जि.सातारा) व रत्नागिरी असे तीन जिल्ह्यातील जात पंचायतीमधील लोक सहभागी झाले होते.

पोलिस अधीक्षकांकडून दखल -

याबाबत सातारा जिल्हा 'अंनिस'कडे लेखी तक्रार आली होती. समितीने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली यावेळी त्यांना सामाजिक बहिष्कार कायदा अस्तित्त्वात असूनही अशा घटना घडत आहेत, याबाबत माहिती देण्यात आली. यानंतर पोलीस अधीक्षकांनी घटनेची दखल घेत संबंधित पंच व तक्रारदार यांना बोलवून चर्चा करावी आणि सामंजस्याने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा रीतसर सामाजिक बहिष्कार कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश दिले. या अनुषंगाने मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अमोल माने व सातारा जिल्हा अंनिस आणि संबंधित सर्व पंच तसेच तक्रारदार यांच्यात सामंजस्य बैठक झाली.

हेही वाचा - हिंगणघाटमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तीला जबर मारहाण; चौघांना अटक

जातपंच‍ायत बरखास्तीचा निर्णय -

बैठकीत सर्व बाजूंनी चर्चा झाली. यानंतर जात पंचायत अशा पद्धतीने अन्यायकारक निर्णय यापुढे घेणार नाही. पीडित कुटुंबातील सर्वांना यापुढे सामावून घेऊन कार्यक्रम घेतले जातील. इतकेच नव्हे तर सर्वच जात पंच यांना एकत्रित करून जातपंचायत बरखास्त करून एक आदर्श निर्माण करू, असे आश्वासन सर्वच उपस्थित पंचांनी दिले. समाजातील आंतरजातीय लग्न केलेल्या व बहिष्कृत केलेल्या सर्व जोडप्यांना व इतर लोकांना एकत्रित बोलावून परत समाजात घेण्याचा निर्णय व त्यांचा सत्कार करू, असेही नियोजन भविष्यात करू असे एकमुखाने सर्वांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, जात निर्मूलनचे राज्य सदस्य शंकर कणसे, बुवाबाजी संघर्ष राज्य सदस्य भगवान रणदिवे, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने, शाखा कार्याध्यक्ष डॉ.दीपक माने, जावळीचे अंनिस कार्यकर्ते प्रतापराव सकपाळ, श्री कांबळे, अॅड. दयानंद माने आदींनी बैठकीला उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला.

हेही वाचा - नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक

Last Updated : Aug 27, 2021, 7:33 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.