ETV Bharat / state

कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोनामुक्तांची संख्या पोहोचली ६०० वर  - सातारा कोरोना अपडेट बातमी

शनिवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये कराड शहरातील 5, मलकापूरमधील 10, कोयना वसाहतमधील 8, कराड तालुक्यातील 11, पाटण तालुक्यातील 2, चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील 1, सोळशी-नायगाव (ता. खंडाळा) येथील 1 अशा 37 जणांचा समावेश आहे. या रूग्णांना कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

six hundred corona patient recovered in krishna hospital at karad

author img

By

Published : Aug 9, 2020, 9:54 AM IST

कराड (सातारा) - कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या 37 कोरोनामुक्त रूग्णांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्याची संख्या 634 वर पोहोचली असल्याची माहिती कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

शनिवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये कराड शहरातील 5, मलकापूरमधील 10, कोयना वसाहतमधील 8, कराड तालुक्यातील 11, पाटण तालुक्यातील 2, चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील 1, सोळशी-नायगाव (ता. खंडाळा) येथील 1 अशा 37 जणांचा समावेश आहे. या रूग्णांना कोरोनामुक्तीचे प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटकाळात कराडचे कृष्णा हॉस्पिटल हे खर्‍या अर्थाने संकटमोचक ठरले आहेत. कोविड रूग्णांसाठी हॉस्पिटल प्रशासनाने स्वतंत्र वॉर्डसह बेड आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था केली आहे.

कोरोना संकटाची व्याप्ती पाहून कृष्णा हॉस्पिटलने अनेक उपाययोजना केल्या. त्यामध्ये स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केली. त्यासाठी शासनाची परवानगीही मिळविली. अत्याधुनिक उपकरणे खरेदी केली. त्यामुळे स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल तातडीने मिळू लागला. आता त्यापुढे पाऊल टाकत कृष्णा हॉस्पिटलने स्वतंत्र कोविड रूग्ण तपासणी ओपीडी उभारण्याचे काम हाती घेतले आहेत. लवकरच ही ओपीडी कार्यान्वित होणार असल्याचेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.