सातारा - कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातल्याने देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. कोणाची उपासमार होऊ नये, यासाठी अनेक दानशूरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सिद्धनाथ नागरी पथसंस्थेकडूनही पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहाय्यक निबंधक विजया बाबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन सुनील पोळ, संचालक नारायण माने, सुरेश इंगळे, गणपत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना चेअरमन सुनील पोळ यांनी सांगितले, की कोरोना विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. संपूर्ण देशात संचारबंदीची स्थिती आहे. मोठी आर्थिक उलाढाल थांबली आहे. अशा संकटाच्या वेळी आपण सर्वांनी एकसंघ राहून कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जीवितहानी रोखण्यासाठी अनेक यंत्रणा उभ्या करण्यात येत आहेत. त्यासाठी निधीची गरज पडणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सिद्धनाथ पथसंस्थेने पाच लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सुपूर्द केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यापूर्वी संस्थेने, दुष्काळ, चारा छावण्या, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, महापूर, अशा विविध संकटात सामाजिक बांधिलकी जपली आहे. यापुढे सिद्धनाथ पथसंस्था चांगल्या कामासाठी कायम अग्रेसर राहिल, असेही ते म्हणाले. यावेळी सहायक निबंधक विजया बाबर यांनी सर्वच संस्थांनी मदत करायची असून त्यांनी त्यांचा निधी थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावा व मदतीचा आकडा फक्त या कार्यालयास कळवावा असे आवाहन केले आहे.
कोरोनाशी लढा; सिद्धनाथ पथसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाखाची मदत
सिद्धनाथ नागरी पथसंस्थेकडूनही पाच लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहाय्यक निबंधक विजया बाबर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. संकटाच्या वेळी आपण सर्वांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे संस्थेचे चेअरमन सुनील पोळ यांनी सांगितले.