सातारा : शिवसागर जलाशयातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांना डोंबिवली- कल्याणचे शिवसेनेचे युवा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कायमस्वरूपी लाईफ जॅकेट आणि स्कूल बोटची व्यवस्था करून दिली आहे. कोयना खोऱ्यातील दरे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे मूळ गाव. हा प्रश्न समजल्यानंतर ते मुंबईवरून आपल्या निवासस्थानी दरे या गावी आले. तेथून खिरखिंडी येथे जाऊन त्यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. व त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
Shreekant Shinde Donated Lifejacket : खिरखिंडीच्या मुलांना स्कुल बोट, लाईफ जॅकेटही : - शिवसेना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे
शिवसागर जलाशयातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांना डोंबिवली- कल्याणचे शिवसेना खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी ( Shreekant Shinde Donated Lifejacket ) कायमस्वरूपी लाईफ जॅकेट आणि स्कूल बोटची व्यवस्था करून दिली आहे.
खिरखिंडी
सातारा : शिवसागर जलाशयातून जीवघेणा प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांना डोंबिवली- कल्याणचे शिवसेनेचे युवा खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी कायमस्वरूपी लाईफ जॅकेट आणि स्कूल बोटची व्यवस्था करून दिली आहे. कोयना खोऱ्यातील दरे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे मूळ गाव. हा प्रश्न समजल्यानंतर ते मुंबईवरून आपल्या निवासस्थानी दरे या गावी आले. तेथून खिरखिंडी येथे जाऊन त्यांनी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. व त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
जावली तालुक्यामध्ये कोयना धरणाच्या किनारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये मौजे खिरखिंडी हे गाव वसलेले आहे. सद्यस्थितीमध्ये गावामध्ये 7 कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या 45 आहे. या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी आहे. त्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अंधारी येथील हायस्कूलमध्ये जावे लागते. आता तो प्रवास सुखकर झाला आहे.
अधिकाऱ्यांची गावभेट
शिक्षणासाठी रोज होडीतून शिवसागर जलाशय ओलांडून जावे लागणाऱ्या मुलींची मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेत, एक याचिका दाखल घेतली आहे. याबाबतच्या बातम्यांमुळे प्रशासनाने फायबर बोट देण्याचा निर्णय जाहीर केला. शासनाची मदत येईपर्यंत या भागाचा सुपुत्र म्हणून शक्य ती मदत करणे माझे कर्तव्य बनते. याच भावनेतून आपण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करुन देत असल्याची प्रतिक्रीया डाॅ. शिंदे यांनी व्यक्त केली.